Home बुलढाणा संग्रामपूर तालुक्यातील कुंदेगाव कोद्री येथील अतिवृष्टी सर्वेतील घोळ प्रकरनी तहसील कार्यलया समोर...

संग्रामपूर तालुक्यातील कुंदेगाव कोद्री येथील अतिवृष्टी सर्वेतील घोळ प्रकरनी तहसील कार्यलया समोर उपोषनाला सूरवात !

84
0

आशाताई बच्छाव

IMG-20221019-WA0030.jpg

संग्रामपूर तालुक्यातील कुंदेगाव कोद्री येथील अतिवृष्टी सर्वेतील घोळ प्रकरनी तहसील कार्यलया समोर उपोषनाला सूरवात !

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

संग्रामपूर तालुक्यातील आवार साझ्यातील कुंदेगाव कोद्री या शिवारामध्ये माहे जुलै 2022 मध्ये ढगफुटी व पुरामुळे अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीबाबतचा सर्वे करण्याचे आदेश संबंधित विभागाने कुंदेगाव व कोद्री गावाचे ग्रामपंचायत सचिव, तलाठी व कृषी सहाय्यक यांना दिले होते. त्यानुसार संबंधित ग्रामपंचायत सचिव व कृषी सहाय्यक यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर न जाता . मर्जीतल्या लोकांचे अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले नाही तरीही अशा काही शेतकऱ्यांची नावे कोतवाल यांच्या सांगण्यावरूनच सर्वे यादीमध्ये समाविष्ट केले आहेत.
शेतातून जाणाऱ्या पाटाने व शेतात पाणी साचल्यामुळे शेतीचे अतिवृष्टीमुळे फार मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नावाचा सर्वे यादीमध्ये समावेश केला नसून.त्यांना अतिवृष्टी मदतीपासून वंचित ठेवले आहे.
त्यामुळे संबंधित अधिकारी यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने खरोखर नुकसान झाले आहे त्यांना अतिवृष्टीचा लाभ देण्यात यावा ‌.तसेच सर्वे करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या मर्जीतील लोकांचा सर्वे केला व त्यातील काही लोकांचे नुकसान नसताना सुद्धा नुकसान दाखवून शासनाची दिशाभूल केली .
अशा काही शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. त्या शेतकऱ्यांच्या पिकाची स्थळ पाहणी करण्यात यावी व चुकीचे सर्वेक्षण करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करून निलंबित करण्यात यावे असे तहसीलदार संग्रामपूर यांना दिलेल्या तक्रारी नमूद केले होते. आणि कार्यवाही न झाल्यास दिनांक 18 ऑक्टोबर 2022 पासून तहसील कार्यालय संग्रामपूर समोर अतिवृष्टी सर्वेतून वंचित राहिलेले सर्व शेतकरी आमरण उपोषणास बसणार असा इशारा निवेदनातून देण्यात आला होता त्या अनुषंगाने दिलेल्या तक्रारी नुसार कुठलीही कार्यवाही झालेली दिसून आली नाही. म्हणून अखेर दिनांक 18 ऑक्टोंबर 2022 पासून कुंदेगाव कोद्री येथील शेतकरी तहसील कार्यालय संग्रामपूर समोर आमरण उपोषणास बसले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here