Home बुलढाणा कोद्री ते वांगरगांव शेत रस्ता मोकळा करण्याची तहसीलदार यांना मागणी!

कोद्री ते वांगरगांव शेत रस्ता मोकळा करण्याची तहसीलदार यांना मागणी!

58
0

आशाताई बच्छाव

IMG-20221019-WA0012.jpg

कोद्री ते वांगरगांव शेत रस्ता मोकळा करण्याची तहसीलदार यांना मागणी!

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

संग्रामपूर तालुक्यातील कोद्री ते वांगरगांव या शेत रस्त्यावरील पाण्यामुळे नाला खचून शेत रस्ता पूर्णपणे बंद झाल्यामुळे शेतात सोयाबीन कपाशी व इतर शेतमालाची वाहतूक करता येत नाही.
त्यामुळे शेतातील शेतमालाचे आधीच अतिवृष्टीमुळे व रस्त्या अभावी फार मोठे नुकसान झाले आहे. आणि आता शेतरस्ता पूर्णपणे बंद झाल्यामुळे उर्वरित पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातातून पूर्णपणे निघून जात असून रब्बी हंगामा साठी जमिनीची मशागत करण्याकरीता व पेरणी करण्याकरता वाहन रस्त्या अभावी शेतात नेता येनार नाही.तरी हा शेत रस्ता नियमानुसार नकाशा प्रमाणे मोजून टाकण्यात यावा सदर रस्त्यावरील नाल्याजवळील शेतमालक व इतर शेतकरी यांच्यात वाद होऊ नये याकरिता हा शेतरस्ता नियमाप्रमाणे वाहतुकीस लवकरात लवकर मोकळा करण्यात यावा अशे निवेदन दिनांक 18 ऑक्टोंबर 2020 रोजी कोद्री येथील शेतकरी अशोकराव खोंड, संतोष आत्माराम खोंड, ओंकार नारायण भोंडे, राजू नागोराव खोंड, देवानंद प्रल्हाद खोंड, श्रीकृष्ण प्रल्हाद खोंड , श्याम श्रीकृष्ण दांदळे , श्रीराम खोंड , संतोष शिंदे, गोपाल दांदळे, गजानन चिकटे , भारत वानखडे व इतर मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here