राजेंद्र पाटील राऊत
वाशीम (गोपाल तिवारी ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):
गुरांची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या आरोपीकडून अनसिंग पोलिसांनी तब्बल तेरा लाख बत्तीस हजार रुपयांचा मु्देमाल जप्त केला आहे. लागोपाठ दोन दिवसांत ही कार्यवाही करण्यात आली आहे. आरोपींवर विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दोन मार्चच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी अनसिंग ते वारला रस्त्यावरून धावणारी बोलेरो पिक अप क्रमांक MH ३७ T ०५०९ या गाडीतून पोलिसांनी गुरे आणि वाहन ताब्यात घेतले आहे. कलम २७९ भादवी सहकलम ११(१) (ड) प्राण्याचा छळ प्रतिबंध अधिनियम सहकलम २३ अ १७७ मोवाकाअन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राजेंद्र अशोक ढोले रा साय खेडा जि वाशिम, पंकज दिगंबर उचित रा सनगाव जि वाशिम, राजु कालवे रा सारशी जि वाशिम या आरोपीविरुद्ध
अनसिंग पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक श्री बच्चनसिंह, अप्पर पोलीस अधिक्षक श्री गोरख भामरे, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री यशवंत केडगे यांच्या मार्गर्शनाखाली अनसिंग ठाण्याचे फौजदार प्रशांत कावरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष देशमुख, सहायक उपनिरीक्षक शेषराव जाधव, पो का माणिक जुंगाडे, मधुकर देसाई, बळीराम चिकाळकर यांनी केली.