Home सामाजिक श्रीमती आशाताईंच्या वाढदिवसानिमित….आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेचा अनोखा उपक्रम! नको ते मनोरंजन,करुया आता वृक्षारोपण!! ...

श्रीमती आशाताईंच्या वाढदिवसानिमित….आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेचा अनोखा उपक्रम! नको ते मनोरंजन,करुया आता वृक्षारोपण!!       

135
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20230602-WA0064.jpg

श्रीमती आशाताईंच्या वाढदिवसानिमित….आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेचा अनोखा उपक्रम! नको ते मनोरंजन,करुया आता वृक्षारोपण!!                    युवा मराठा न्युजच्या महाराष्ट्रभरातील वाचक,दर्शक,प्रेक्षक,व हितचिंतकानो १२ जुन हा युवा मराठा न्युजच्या सर्वस्व,व्यवस्थापकीय संपादक तथा आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेच्या संस्थापक सचिव श्रीमती आशाताई बच्छाव यांचा वाढदिवस! खरं तर आजकाल वाढदिवसाला वेगवेगळ्या प्रकारचे फँड आलेले आहे.या वाढदिवसानिमित कुणी पार्टया झोडतात.तर कुणी कुठले तरी मनोरंजनाचे फँड निर्माण करुन वेडया जनतेची दिशाभूल करतात.पण…वाचकहो,आपण खरे अर्थाने आपले नैतिक कर्तव्य विसरत चाललोय.निसर्गाने आपल्याला बहाल केलेली निसर्ग संपदा नष्ट होत असताना आपण हे सगळे उघडया डोळ्यांनी बघत आहोत.बेसुमार होत असलेली वृक्षतोड आणि त्यामुळे घटलेले प्रजन्यमान व त्याशिवाय शुध्द हवेचा अभाव अन आँक्सिजनचा होत असलेला तुटवडा हि नैसर्गिक आपती आपल्याला एके दिवशी निश्चितच खाईत घेऊन जाणार आहे.म्हणूनच आपले नैतिक कर्तव्य व जबाबदारी समजून आपण एक तरी वृक्ष लागवड केली पाहिजे..या संकल्पनेतून आश्रयआशा फाऊंडेशन व-हाणे या संस्थेने श्रीमती आशाताई बच्छाव यांच्या वाढदिवसानिमित एक आगळी वेगळी संकल्पना राबवून बारा तारखेला बारा झाडे लावून त्याचे संवर्धन करण्याबरोबरच पर्यावरणाचे स्वरक्षण करुन एका राष्ट्रीय कार्याला आरंभ व-हाणे गावापासून सुरु करावयाचा निर्णय संस्थेच्या संचालकांनी घेतला आहे.तस बघितले तर श्रीमती आशाताईचा वाढदिवस हा दरवर्षी युवा मराठा परिवार आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा करीत असतो,गोरगरीब निराधारांना कपडे लते वाटप करणे,स्नेहभोजन देऊन अतिथी देवो भव प्रमाणे अन्नदान करणे,तर स्वतः आशाताई बच्छाव या एक निराधार व निराश्रीत असताना सुध्दा अन कुणाही नातेवाईकांचे पाठबळ किंवा आधार नसताना सुध्दा या ना त्या प्रकारे आपल्या व-हाणे गावात मराठी शाळेला अनेक प्रकारे विविध भेटवस्तू देऊन सतत आपले सामाजिक कार्य करीत असतात.तर गेल्या सन २०२० पासून व-हाणे गावातच सार्वजनिक पाणपोई चालवून पांथस्थाची तृष्णा भागविण्यासाठी स्वखर्चाने कार्य करीत आहेत.आणि आता वृक्षारोपण कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रकार्य आपल्या वाढदिवसानिमित शासनाशी व या देशाशी असलेल्या निष्ठेला जागृत ठेऊन समर्पित करीत आहोत.आशाताईच्या कार्याला मानाचा सलाम! लेखन शब्दांकन -राजेंद्र पाटील राऊत मुख्य संपादक युवा मराठा न्युज महाराष्ट्र

Previous articleयुवा मराठा पत्रकाराचे “अनुभवाचे बोल”
Next articleपद्मश्री तसंच महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं निधन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here