आशाताई बच्छाव
नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी!
भास्कर देवरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)
राष्ट्रीय अनुसूचित जनजमाती आयोगाने नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले असून 1 फेब्रुवारी पर्यंत त्याच्या अंमलबजावणीच्या आदेश पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांना दिले आहेत. त्यामुळे नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांवर अटकेची टांगती तलवार आहे. त्यांच्यासोबतच ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप आणि नगरचे जिल्हाधिकारी, अधीक्षक यांच्या नावे देखील अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. इगतपुरी तालुक्यातील वेठबिगारी प्रकरणात साक्षीदार म्हणून हजर न राहणे-अहवाल सदर न करणे या अधिकाऱ्यांना आता अंगलट आले आहे. वेठबिगारी प्रकरनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही कारवाई करण्यात येत असून आयोग आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे.
इगतपुरी तालुक्यातील उभाडे गावात आदिवासी कातकरी समाजातील एका बालिकेचा खून झाला होता. त्यामुळे वेठबिगारी अजूनही अस्तित्वात असून वेबिगारीचे भयाण सत्य पुन्हा जगासमोर आले होते. या गावात आदिवासी कातकरी समाजातील कुटुंबाला पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या मुलांची विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले होते.
या प्रकरणांची सध्या पोलीस आणि न्यायालयीन चौकशी सुरु असून नाशिक आणि अहमदनगरचे जिल्हाधिकारी, ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना या प्रकरणाचे साक्षीदार म्हणून हजर राहण्याचा समन्स बजावण्यात आला होता मात्र ते हजर न राहिल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत आहे.
या चारही अधिकाऱ्यांना सोमवार २ जानेवारीला आयोगाने समाज बजावला होता मात्र याकडे या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले त्यामुळे आयोगाने थेट पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे आणि संबंधितांविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. 1 फेब्रुवारी पर्यंत महासंचालक महासंचालकांतर्फे संबंधितांवर कारवाईची शक्यता आहे.






