Home नाशिक व-हाणे प्रकरणात…..”शिर”एक विचार “साठ”;कशी सुटणार माहिती अधिकाराची गाठ! माहिती अधिकारात दिलेली माहिती...

व-हाणे प्रकरणात…..”शिर”एक विचार “साठ”;कशी सुटणार माहिती अधिकाराची गाठ! माहिती अधिकारात दिलेली माहिती किती खरी;किती खोटी?

62
0

राजेंद्र पाटील राऊत

20230124_102045-BlendCollage.jpg

व-हाणे प्रकरणात…..”शिर”एक विचार “साठ”;कशी सुटणार माहिती अधिकाराची गाठ! माहिती अधिकारात दिलेली माहिती किती खरी;किती खोटी?
राजेंद्र पाटील -राऊत
मालेगांव-स्वर्गिय लोकनेते तुकाराम (भाऊ) शंकर पवार हे मालेगांव तालुका पंचायत समितीचे सभापती असताना,त्यांनी आपल्या कार्यकाळात आपल्या व-हाणे,ता.मालेगांव जि.नाशिक या गावी आदिवासी (भिल्ल) समाजाच्या वस्तीजवळ एक सार्वजनिक जलकुंभ तयार करवून घेतला होता.या जलकुंभाच्या जागेवर बोर करुन त्यात जलपरीची व्यवस्था करण्यात आल्यामुळे या जलकुंभातून वर्षानुवर्षे पाणीपुरवठा व-हाणे ग्रामवासियांना होत होता,अनेक वर्ष सुस्थितीत चाललेला हा जलकुंभ पुढे नादुर्रुस्त झाला.पण…तो पुढे सुधारुन चालविण्याचे सौजन्य मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने दाखविले नाही.सदरचा जलकुंभ असाच बिघडलेल्या अवस्थेत कित्येक वर्षापर्यत आदिवासी वस्तीच्या कोपऱ्यात आपल्या शेडसह उभा होता.मात्र कालातंराने सरपंच सौ.विमलबाई गायकवाड यांच्या कार्यकाळात सदरचा जलकुंभ बंद करण्यात येऊन,त्या जलकुंभाचे साहित्य जलपरी,इलेक्ट्रिक मोटर,स्टार्टर,वायर,शेडसाठी असलेले पत्रे,व सिमेंट टाकी आणि त्या टाकीला असलेल्या नळाच्या तोटया आदी साहित्य ग्रामपंचायत प्रशासन नेमके टाकले कुठे याचा मात्र खात्रीशीर उलगडा होऊ शकलेला नाही.या संदर्भातील अधिक माहिती माहितीच्या अधिकारातून तेथील जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवक हेमंत शिरसाठ यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी याबाबतीत बिनबुडाची व खोटी माहिती जिओ टँग फोटोव्दारे उपलब्ध करुन दिली.म्हणजे “शिर” एक विचार “साठ” अशी अवस्था असलेले ग्रामसेवक शिरसाठ तरी खरी माहिती कशी देतील?काम करताना एका शिराचा (डोक्याचा) वापर करावा लागतो,येथे मात्र वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देणारे साठ विचारवंत असतात मग माहिती अधिकारात मिळालेली माहिती नेमकी खरी कशी समजायची? शेवटी हा प्रश्न निर्माण होतोच!युवा मराठा न्युजकडे प्राप्त असलेल्या माहितीनुसार सदर जलकुंभ सरपंच सौ.विमलबाई गायकवाड यांच्या कार्यकाळात बंद केल्यानंतर तेथील साहित्य गावातीलच एका व्यक्तीला हनुमान मंदीरासमोर करण्यात आलेल्या लिलावाव्दारे विक्री करण्यात आल्याच्या गोष्टीला सगळे गाव साक्ष असताना सुध्दा हा खोटारडेपणा कशासाठी?व कुणाच्या सांगण्यावरुन रचण्यात आला.विक्री केलेल्या साहित्याचे पैसे देखील गावातीलच एक सडकछाप पुढारी हडप करुन गेला असल्याची नागरिकात चर्चा आहे.मग ग्रामपंचायत प्रशासनाने माहिती अधिकारात माहिती देताना जिओ टँग फोटोव्दारे दाखविलेल्या वस्तु नेमक्या कोणत्या याचाही पर्दाफाश आता लवकरच राज्य माहिती आयुक्ताच्या खंडपीठापुढे होईल एव्हढे मात्र निश्चित! उद्या वाचा 👉 निर्लिखित नसलेले दोन वाडगी शौचालय गेले कुठे? शासनाच्या निधीचा गैरवापर केला कुणी?वाचा सविस्तर व रोखठोक…

Previous articleनाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी!
Next articleनाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीत सुरेश भीमराव पवार यांना विजयी करा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here