Home नांदेड पाचवी व आठवीमध्ये नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी करावी

पाचवी व आठवीमध्ये नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी करावी

86
0

आशाताई बच्छाव

FB_IMG_1654935780105.jpg

पाचवी व आठवीमध्ये नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी करावी
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार युवा मराठा न्यूज नेटवर्क
नांदेड (जिमाका) दि. 18 :- महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या प्राथमिक स्तर (इयत्ता 5 वी ) व उच्च प्राथमिक स्तर (इयत्ता 8 वी ) परीक्षेकरिता नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नावनोंदणी व प्रवेश अर्ज दिनांक 7 नोव्हेंबर 2022 या पर्यत http://msbos-ssc.ac.in वर ऑनलाईन नाव नोंदणी करावी, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाकडून करण्यात आले आहे.

नावनोंदणी अर्ज स्विकारण्यासाठी सोमवार 17 ऑक्टोबर 2022 ते 5 नोव्हेंबर 2022 रात्री 11.59 वाजपर्यंत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत. बुधवार 19 ऑक्टोबर 2022 ते गुरूवार 10 नोव्हेंबर 2022 पर्यंत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावे. शुक्रवार 18 नोव्हेंबर 2022 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करावे, असे महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here