Home अमरावती तळेगावच्या विधवा, निराधार महिलेला मिळाला हक्काचा निवारा

तळेगावच्या विधवा, निराधार महिलेला मिळाला हक्काचा निवारा

55
0

आशाताई बच्छाव

IMG_20231120_180114.jpg

तळेगावच्या विधवा, निराधार महिलेला मिळाला हक्काचा निवारा
लोकविकास व अ. भा. ग्रामीण पत्रकार संघाने पुर्ण केला संकल्प.                                                   (फोटो)
मयुर खापरे चादुंर बाजार-–                      तालुक्यातील तळेगाव मोहना निवासी वैशाली संजय नवलकर या विधवा,निराधार महिलेच्या घराची परिस्थिती अत्यंत शिकस्त होती ते केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत होते.पतीच्या गेल्यानंतर दोन लेकराचे पालन-पोषण करण्यासोबत आपला जीव मुठीत घेऊन आपल्या लेकरा सह या पडक्या घरात आपले जीवन जगत होती.घरकुलाचा लाभ मिळत नसल्याने कुटुंबाच्या उपजिविके सोबत घराचे बांधकाम करणे वैशालीला शक्य नव्हते.अशातच वैशालीची करुण कहानी लोकविकास संघटनेच्या गोपाल भालेराव व रमण लंगोटे यांना अवगत करण्यात आली.त्यांनी अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे प्रसिध्दीप्रमुख सागर सवळे यांना दिली.सर्वांनी वैशालीला पक्का निवारा बांधून देण्याचा संकल्प करुन चांदूरबाजार शहरासह तालुक्यातील दानदात्यांच्या आर्थिक सहकार्यातुन वैशालीला पक्के घर बांधून दिले.या नविन घराचे लोकार्पण भाऊबिजेच्या पर्वावर नुकतेच करण्यात आले.यात गो.सी.टोम्पे महाविद्यालयाचे अध्यक्ष भाष्कर टोम्पे,जगदंब इंग्लीश स्कुलचे अध्यक्ष विनोद कोरडे,सामाजिक कार्यकर्ता मनोज कटारीयासह अनेक दानदात्यांनी आर्थिक सहकार्य करुन मोलाचे सहकार्य केले.लोकविकास संघटना,अ.भा.ग्रामीण पत्रकार संघ यांचा पुढाकार व परिश्रम व दानदात्यांचे सहकार्या यामुळे आज निराधार,विधवा वैशाली व त्यांच्या मुलांना हक्काचे पक्के घर मिळाले.हा या संघटनेचा दुसरा सेवा उपक्रम आहे.गेल्यावर्षी दिलालपुर येथील विधवा, निराधार दिव्यांगना डोंगरे या वृध्द महिलेला पक्के घर बांधून दिले आहे.
रविवारी दुपारी ४ वाजता तळेगाव मोहना येथे वैशालीचा आपल्या मुलांसह नविन घरात गृहप्रवेश झाला.यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात लोकविकास संघटनेचे अध्यक्ष गोपाल भालेराव,संघटक रमण लंगोटे,अ.भा.ग्रामिण पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर सुने,सरचिटणीस सुरेश सवळे,प्रसिध्दी प्रमुख सागर सवळे,जगदंब स्कुलचे अध्यक्ष विनोद कोरडे,सामाजिक कार्यकर्ता मनोज कटारीया,तळेगावचे सरपंच ज्ञानेश्वर सिरसाट,जिवन आधारचे सुयोग गोरले,सुपर भारतचे मयुर खापरे आदींची उपस्थिती होती.आपल्याला हक्काचे पक्के घर बांधून दिल्याबद्दल वैशालीने लोकविकास संघटना,अ.भा.ग्रामिण पत्रकार संघ व आर्थिक सहकार्य करणार्‍या दानदात्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त आभार व्यक्त केले.यावेळी गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी
इरफान सौदागर, ऋषिकेश चराटे, श्याम पारीसे, वेदांत नवलकर, दत्तात्रेय अकोलकर आदींनी परिश्रम केले.

Previous article_सिंचनासाठी पाण्याचा योग्य वापर करून उत्पादन घ्या_..
Next articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देगलुरातील सर्व पदाधिकारी यांना दिवाळी भेट.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here