Home गडचिरोली शेकापच्या दणक्याने गडचिरोलीतील अतिदक्षता विभाग सुरू : भाई जयंत पाटील यांच्या प्रयत्नांना...

शेकापच्या दणक्याने गडचिरोलीतील अतिदक्षता विभाग सुरू : भाई जयंत पाटील यांच्या प्रयत्नांना यश

36
0

आशाताई बच्छाव

IMG-20220905-WA0027.jpg

शेकापच्या दणक्याने गडचिरोलीतील अतिदक्षता विभाग सुरू : भाई जयंत पाटील यांच्या प्रयत्नांना यश

गडचिरोली,(सुरज गुंडमवार) : गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील अत्याधुनिक अतिदक्षता विभागाची निर्मिती लाखो रुपये खर्चून करण्यात आली होती. सदर अतिदक्षता विभागाचे तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात येवून दोन वर्षे उलटल्यानंतरही फायर ऑडिटच्या नावाखाली सदर अत्याधुनिक अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आले नव्हते याबाबत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करताच कुलूपबंद अत्याधुनिक अतिदक्षता विभाग तातडीने सुरू करण्यात आले आहे.

सदर अतिदक्षता विभाग तातडीने सुरू करण्यात यावे यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्री वेळदा यांनी १६ जून रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती, मात्र ते रुग्णांकरीता ते सुरू करण्यात आले नव्हते.

याबाबत आमदार भाई जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित करुन दोषी अधिकाऱ्यांसह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रुडे यांची चौकशी करण्याची मागणी करताच कारवाईच्या भितीने तातडीने सदरचे अत्याधुनिक अतिदक्षता विभाग रुग्णांसाठी सुरू करुन कारवाई होण्यापासून वाचण्याचा प्रयत्न रुग्णालय प्रशासनाने केला असून वरिष्ठांना उत्तरादाखल पत्रव्यवहार करून तळमजल्यावरील हा अतिदक्षता विभाग सुरुच असल्याची सारवासारव अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मार्फत करण्यात आली आहे. सदर सुविधा रुग्णांना मिळणे सुरू झाल्याने अनेक रुग्णांच्या नातेवाइकांनी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील आणि महिला नेत्या जयश्री वेळदा यांचे आभार मानले आहेत.

गडचिरोली सारख्या मागास जिल्ह्यात अत्याधुनिक अतिदक्षता विभाग तयार होवूनही ते सुरू होण्यासाठी दोन वर्षे का लागली आहेत यासह विविध मुद्द्यांबाबत यानिमित्ताने वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्यासाठी आमदार भाई जयंत पाटील पाठपुरावा करणार असून यात अनियमितपणा होण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर लवकरच मोठी कारवाई होणार असल्याची अपेक्षा शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी व्यक्त केली आहे.

Previous articleजगन्नाथ ताराचंद कासलीवाल इंग्लिश मिडीयम मध्य शिक्षक, दिन उत्साहात साजरा।       
Next articleएसटी कामगार संघाच्या विभागीय अध्यक्षपदी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here