Home गडचिरोली एसटी कामगार संघाच्या विभागीय अध्यक्षपदी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची निवड

एसटी कामगार संघाच्या विभागीय अध्यक्षपदी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची निवड

38
0

आशाताई बच्छाव

IMG-20220904-WA0065.jpg

एसटी कामगार संघाच्या विभागीय अध्यक्षपदी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची निवड

गडचिरोली,(सुरज गुंडमवार)
एसटी कर्मचारी संघाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांनी केली निवड

सार्वजनिक विश्रामगृह गडचिरोली येथे झालेल्या बैठकीत केली घोषणा

गडचिरोली, अहेरी व ब्रह्मपुरी या ३ बस स्थानकांच्या गडचिरोली विभागाच्या अध्यक्षपदी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमुखाने निवड केली

यावेळी विभागीय मार्गदर्शक म्हणून खासदार अशोकजी नेते , विभागीय कार्याध्यक्ष म्हणून प्रकाश गेडाम यांची तर विभागीय सचिव म्हणून प्राध्यापक शैलेंद्रजी पिसे, विभागीय कोषाध्यक्ष संजय पुनावार यांची निवड करण्यात आली

माननीय गोपीचंद पडळकर यांच्या संघर्षातून निर्माण झालेल्या या संघटनेच्या विभागीय अध्यक्षपदी आपली निवड केल्याबद्दल आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी एसटी कर्मचारी संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याचे आभार मानले . एसटी कर्मचाऱ्यांवर आजपर्यंत नेहमीच अन्याय झालेला आहे .आपल्या अन्यायाच्या विरोधात आपण यापूर्वीही आवाज उठवलेला असून आपल्या मागण्यांसाठी आपण भक्कमपणे आपल्या पाठीशी उभे राहू असे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी याप्रसंगी केले.
यावेळी सेवा संघर्ष शक्ती एसटी कर्मचारी संघाचे रवींद्र पूज्जलवार ,मालाताई सहारे, संजय पुणावार, अरुण माडमवार, केशव शेळके, नारायण फड, किशोर सातपुते, तुषार नंदनवार दुर्योधन कुलसंगे, गणेश कोडापे, हरीश वैरागडे, महेश जंजाळकर ,सुधीर मसराम, बी.सी. पत्तीवार प्रामुख्याने उपस्थित होते

Previous articleशेकापच्या दणक्याने गडचिरोलीतील अतिदक्षता विभाग सुरू : भाई जयंत पाटील यांच्या प्रयत्नांना यश
Next articleपोलीस भरती करीता येणाऱ्या उमेदवारांची निवास व भोजनाची व्यवस्था करणार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here