Home गडचिरोली पोलीस भरती करीता येणाऱ्या उमेदवारांची निवास व भोजनाची व्यवस्था करणार

पोलीस भरती करीता येणाऱ्या उमेदवारांची निवास व भोजनाची व्यवस्था करणार

52
0

आशाताई बच्छाव

IMG-20220904-WA0051.jpg

पोलीस भरती करीता येणाऱ्या उमेदवारांची निवास व भोजनाची व्यवस्था करणार

गडचिरोली,(सुरज गुंडमवार)
राष्ट्रवादी युवक काँग्रेस गडचिरोली चा सामाजिक उपक्रम
गडचिरोली शहरात जिल्हा पोलीस भरती 2022 च्या शारीरीक व मैदानी चाचणीस येणाऱ्या जिल्ह्यातील बाराही तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील उमेदवारांची पावसाळ्या अभावी गैरसोय टाळण्याकरीता राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे उमेदवारांना निवासाची व भोजणाची निशुल्क्‍ व्यवस्था तसेच शहरापासून पोलीस मुख्यालया पर्यंत उमेदवारांना जाण्याकरीता बससेवेचे नियोजन सुध्दा करण्यात आलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आदरणीय आमदार धर्मरावबाबा आत्राम, माजी जि. प. अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष रविंद्र वासेकर यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून शारीरिक व मैदानी चाचणीस आलेल्या उमेदवार मुलांची निवास व भोजन व्यवस्था पटेल मंगल कार्यालय चंद्रपूर रोड येथे तर उमेदवार मुलींची निवास व भोजन व्यवस्था सुमानंद मंगल कार्यालय आरमोरी रोड गडचिरोली येथे करण्यात आली आहे. तसेच उमेदवारांना शहरातून पोलीस मुख्यालयात जाण्या करीता मोफत बसेसची व्यवस्था सुध्दा करण्यात आलेली असून या सर्व सामाजीक उपक्रमाचे नियोजन राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष लिलाधर भरडकर, विधानसभा अध्यक्ष रुपेश वलके, शहर अध्यक्ष अमोल कुळमेथे, जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पवार, तालुका अध्यक्ष श्रीधर येरावार, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष चेतन पेंदाम, जिल्हा संघटक रंजीत रामटेके, संजय शींगाडे, कपील बागडे, योगेश नांदगाये, कीशोर बावणे, संकेत जनगणवार, गणेश बावणे, रीतीक डोंगरे, मुझाहीत पठाण, दीपक नंदेश्वर व सर्व राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी योग्य नियोजन करीत आहेत. तरी, गरजू उमेदवारांनी सार्वजनीक ठीकाणी व इतरत्र कुठेही आसरा न घेता नियोजीत ठीकाणी केलेल्या निवास व्यवस्थेत विश्रांती घ्यावी ही विनंती.

Previous articleएसटी कामगार संघाच्या विभागीय अध्यक्षपदी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची निवड
Next articleसंग्रामपुर शिवारातील गुरांवर लंपी आजाराचे सावट:शेतकऱ्यांत चिंता,
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here