Home बुलढाणा संग्रामपुर शिवारातील गुरांवर लंपी आजाराचे सावट:शेतकऱ्यांत चिंता,

संग्रामपुर शिवारातील गुरांवर लंपी आजाराचे सावट:शेतकऱ्यांत चिंता,

40
0

आशाताई बच्छाव

IMG-20220905-WA0047.jpg

संग्रामपुर शिवारातील गुरांवर लंपी आजाराचे सावट:शेतकऱ्यांत चिंता,
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज बुलडाणा
वेळेत लसीकरण करण्याची मागणी
संग्रामपुर तालूक्यात शिवारातील गुरांना अशाप्रकारे लंपी आजाराची लक्षणे दिसत आहेत.
लंपी त्वचा रोग हा एक संसर्गजन्य रोग आहे जो डास, माशी चावल्यानंतर किंवा गुरांच्या थेट संपर्कात आल्याने तसेच दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे तो पसरतो. ही लक्षणे आढळणाऱ्या जनावरांना वेळीच उपचार न मिळाल्यास त्यांच्या मृत्यू देखील होऊ शकतो. गुरांमध्ये हा रोग अतिशय झपाट्याने पसरत आहे, याला लंपी स्किन डिस्चार्ज व्हायरस (एलएसडीव्ही) म्हणतात. मागील आठ दिवसांमध्ये या रोगाच्या प्रादुर्भावाखाली आलेल्या वानखेड येथील 8 ते 10 जनावरे उपचाराअभावी त्रस्त आहेत.

यामुळे पशुपालक, शेतकरी चिंतेत असून पशुधन विभागाने तातडीने गुरांवर उपचार करावा, या गुरांना वेळीच लस, उपचार उपलब्ध करून द्यावेत तसेच हा संसर्ग इतर जनावरांना होऊ नये त्यासाठी तात्काळ पाऊले उचलावीत

शहरासह ग्रामीण भगतही पशुधन आधीच कमी होत असले, तरी आजही शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात जनावरांची संख्या मोठी आहे. मागील आठ दिवसांपासून वानखेड शिवारातील शेत वस्त्यांवर व गावठान भागात लंपी आजाराने थैमान घातले आहे. जनावरांच्या दूध उत्पादनावरही याचा परिणाम होत आहे. पशुधन विभाग मात्र अपूर्ण कर्मचारी वर्गामुळे गुरांना उपचार करण्यास विलंब लावत असल्याचा आरोप करत शेतकरी करत आहेत.

वानखेड येथील शेतकऱ्यांना त्यांच्या गुरांवर उपचार करण्यासाठी 12 किलो मीटर दूर असणाऱ्या पातृर्डा
येथील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते. गाव पातळीवर येऊन उपचार करण्यासाठी एकही वैद्यकीय अधिकारी किंवा पर्यवेक्षक उपलब्ध होत नाही. परिणामी उपचाराअभावी गुरे मरण पावतात. त्यातच हा महाभयंकर रोग वानखेड येथे धडकल्याने गावातील शेतकरी भयभीत झाले आहेत.

या संदर्भात पशु संवर्धन विभागातील खाजगी डाँ यांनी गावात पाहणी केली असता हा लंपी स्किन डिस्चार्ज व्हायरस असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. यात शेतकऱ्यांनी संबंधित गुरांना इतर गुरांपासून वेगळे ठेवावे, त्यांच्यावर वेळीच उपचार सुरू करण्यासाठी शासकीय यंत्रणेला ही माहीती कळवावी असे सांगितले

”मागील आठ ते दहा दिवसांपासून हा आजार गुरांना सतावू लागला आहे. आता तो भीषण स्वरूप घेत आहे. तरी पण तात्काळ ग्रामपंचायत च्या माध्यमातून लेखी स्वरुपात पशुसंवर्धन विभाग देणे गरजेचे आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here