• Home
  • व-हाणेतील बोगस ग्रामसभा शासनाकडे चौकशीची मागणी !! माहिती अधिकारातून होणार सत्यता उघड…

व-हाणेतील बोगस ग्रामसभा शासनाकडे चौकशीची मागणी !! माहिती अधिकारातून होणार सत्यता उघड…

राजेंद्र पाटील राऊत

Screenshot_20221112-073458_Facebook.jpg

व-हाणेतील बोगस ग्रामसभा शासनाकडे चौकशीची मागणी !! माहिती अधिकारातून होणार सत्यता उघड…
राजेंद्र पाटील राऊत
(युवा मराठा न्यूज नेटवर्क )
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या व-हाणे ग्रामपंचायतीने आयोजीत केलेली ग्रामसभा हि बोगस व बनावट स्वरुपात दाखवून शासनाच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार ग्रामसेवक व सरपंचाच्या संगनमताने घडला.वास्तविक राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाने मालेगांवच्या पंचायत समितीसमोर विविध आंदोलन केल्यामुळे सदरच्या विशेष ग्रामसभेचे आयोजन १५ नोव्हेंबरला पत्रकार भवनच्या जागा निर्णयाबाबत करण्यात आले होते.मात्र सदरची ग्रामसभा हि बोगस व बनावट स्वरुपात घेण्यात आली,सदरच्या ग्रामसभेला बोटावर मोजण्याइतकेच ग्रामस्थ उपस्थित असताना ग्रामसेवक व सरपंचाच्या संगनमताने ग्रामसभा व्यवस्थित पार पडल्याचा बनाव रचण्यात आला,त्यामुळे शासनाच्या ग्रामसभा धोरणाला काळीमा फासण्याचा कुटील डाव खेळला गेला.तसे पाहता ग्रामसभेचे आयोजन ज्या प्रयोजनासाठी करण्यात आलेले होते तो मुळ विषय बाजुलाच ठेऊन वेगळेच विषय मध्ये घालण्यात आले.त्यामुळे हि निव्वळ शासनाची दिशाभूल असून कागदोपत्री बोगस ग्रामसभेचे बिंग आता माहिती अधिकारातून उघड होणार आहे,तसेच या बोगस ग्रामसभेची चौकशीची मागणीही विभागीय आयुक्ताकडे निवेदनाव्दारे केली जाणार आहे.

anews Banner

Leave A Comment