Home नाशिक जगन्नाथ ताराचंद कासलीवाल इंग्लिश मिडीयम मध्य शिक्षक, दिन उत्साहात साजरा।     ...

जगन्नाथ ताराचंद कासलीवाल इंग्लिश मिडीयम मध्य शिक्षक, दिन उत्साहात साजरा।       

80
0

आशाताई बच्छाव

IMG-20220905-WA0033.jpg

जगन्नाथ ताराचंद कासलीवाल इंग्लिश मिडीयम मध्य शिक्षक, दिन उत्साहात साजरा।                    नांदगांव प्रतिनिधी अनिल धामणे                       नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन उत्साहाने साजरा केला. या दिवसाचा संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांनी आखला होता. तो अत्यंत नेटकेपणाने पार पडला . शिक्षक दिनाच्या निमित्ताने शाळेचे संपूर्ण कामकाज त्यादिवशी विद्यार्थ्यांनी सांभाळले. शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांचे पाठ घेतले. वर्गातील विद्यार्थ्यांनी त्यांना उत्तम सहकार्य दिले. मधल्या सुट्टीनंतर शाळेच्या प्रांगणात समारंभ आयोजित करण्यात आला. विद्यार्थी प्रतिनिधी सार्थक देशमुख ,कोमल भावसार यांनी सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन शिक्षकांसाठी करण्यात आले होते. त्यामध्ये जिलेबी रेस, संगीत खुर्ची, लिंबू चमचा. वकृत्व स्पर्धा,समूह नृत्य अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थी शिक्षकांनी आपल्या मनोगतातून शिक्षकाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. मुख्याध्यापक श्री मनी चावला सर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रोत्साहित केले. प्रयत्न करत रहा यश हमखास मिळेल असे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी केक कटिंग करण्यात आला.
सर्व विद्यार्थीना व शिक्षिकांना संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल तसेच संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा, जुगलकिशोर अग्रवाल, रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदीवाल,सर्व पदाधिकारी,प्रशासन अधिकारी प्रकाश गुप्ता, प्रिन्सिपल मनी चावला शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षक पुनम सुराणा व वीरा पाटणी यांनी केले.

Previous articleनांदगांव शहरातील वीर जवान स्मारक धोक्यात।
Next articleशेकापच्या दणक्याने गडचिरोलीतील अतिदक्षता विभाग सुरू : भाई जयंत पाटील यांच्या प्रयत्नांना यश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here