Home अमरावती टोम्पे महाविद्यालयात महात्मा फुले यांना अभिवादन

टोम्पे महाविद्यालयात महात्मा फुले यांना अभिवादन

47
0

आशाताई बच्छाव

IMG_20231129_065530.jpg

टोम्पे महाविद्यालयात महात्मा फुले यांना अभिवादन

मयुर खापरे चादुंर बाजार
चांदूरबाजार :
स्थानिक गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके, डॉ. रवींद्र डाखोरे, डॉ, जयंत बनसोड, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रवीण परिमल, आयक्यूएसी कॉर्डिनेटर डॉ. नंदकिशोर गव्हाळे, डॉ. धनंजय बिजवे, डॉ. प्रिया देवळे, डॉ. निधी दीक्षित, डॉ. ज्ञानेश्वर वारंगे, डॉ. संजय कोठारी, डॉ. प्रशांत सातपुते, डॉ. आशुतोष राजगुरे, डॉ. लालबा दुमटकर, प्रा. मंजुषा पवार, शिक्षकेतर कर्मचारी श्री नितीन तसरे, श्री गोपाल प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून म्हणाले, महात्मा फुले यांनी शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, दलित यांच्यासाठी शैक्षणिक, सामाजिकदृष्ट्या मोठे कार्य केले. विशेषत: मुलीसाठी शिक्षणाची द्वारे खुले केले. आज महिला शिकून ज्या मोठ्या पदावर विराजमान आहेत ते सर्व महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्यामुळेच असे म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. युगंधरा गुल्हाने यांनी केले.

Previous articleदुष्काळी मदत व पीकविमा वाटप करा अन्यथा शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयास कुलूप लावण्याचा इशारा
Next articleअमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या १३.९३ कोटिवर विमा कंपनीचा डोळा !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here