Home जालना जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यात उपाय योजना लागु करा 

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यात उपाय योजना लागु करा 

99
0

आशाताई बच्छाव

IMG_20231112_120407.jpg

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यात उपाय योजना लागु करा
जाफ्राबाद, परतूर, घनसावंगी तालुक्यांचा दुष्काळग्रस्त म्हणून समावेश करा; जिल्हा काँग्रेसची जोरदार मागणी
जालना,(दिलीप बोंडे)-शासनाने जालना जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळग्रस्तातून वगळले आहेत. जाफ्राबाद, परतूर आणि घनसावंगी या तीन तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त म्हणून करण्यात यावा आणि जिल्ह्यातील पाच तालुक्यातील दुष्काळीच्या उपाययोजना तात्काळ लागु करण्यात याव्यात आदि मागण्याचे निवेदन जालना जिल्हा ग्रामीण, शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांना एका शिष्टमंडळा मार्फत देण्यात आले.शासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, जिल्ह्यातील आठ तालुक्या पैकी जाफ्राबाद, परतूर आणि घनसावंगी तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर न झाल्यामुळे  आगामी काळात जनतेला मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल आणि शेतकर्‍यांवर कठिण परिस्थिती निर्माण होऊन त्यांचे जगणे कठीण होईल म्हणून शासनाने या तीन तालुक्यात दुष्कघाळ जाहिर करावा व सर्व प्रकारच्या पिक विम्याची रक्कम शेतकर्‍यांना तात्काळ देण्यात यावी. सोयाबिन, कापुस, पान या पिकासह सर्व पिेकांची हमी भाव खरेदी केंद्र तात्काळ सुरु करण्यात यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
जालना शहरासह जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त भागात तात्काळ टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा राज्यात वाढत्या महागाईमुळे जन सामान्य माणूस अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये आपले जीवनमान जगत आहे, शासनाने पेट्रोल, डिजेल आणि घरगुती गॅसच्या किंमती भरमसाठपणे वाढविले आहेत त्या ताबडतोब कमी करण्यात याव्यात आदि विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here