Home बुलढाणा विज वितरणची असंवेदनशीलता….शेतकऱ्यांचे जीव संकटात! मानसिक यातनांची लोकप्रतिनिधींनाही खंत नाही!

विज वितरणची असंवेदनशीलता….शेतकऱ्यांचे जीव संकटात! मानसिक यातनांची लोकप्रतिनिधींनाही खंत नाही!

80
0

आशाताई बच्छाव

IMG_20231112_173911.jpg

विज वितरणची असंवेदनशीलता….शेतकऱ्यांचे जीव संकटात! मानसिक यातनांची लोकप्रतिनिधींनाही खंत नाही!

स्वप्निल देशमुख ब्यूरो चीफ बुलढाणा

बुलढाणा :- जगाचा पोशिंदा शेतकरी’ हे विधान सत्य असले तरी, राजकारण्यांसाठी हे ब्रीद केवळ कांगावा करून मत जिंकण्याचे माध्यम ठरले आहे. शेतात असलेल्या कोवळ्या पिकांना जगवण्यासाठी शेतकऱ्यांना आता ”अंधार यातना भोगाव्या लागत आहेत. दिवसभर शेतात राबायचे आणि रात्रभर ओलितासाठी जागायचे, असे धोरण महावितरणने हाती घेतल्याचे दिसून येत आहे. या गंभीर प्रकारामुळे शेतकऱ्यांना वेदना सहन कराव्या लागत आहे. परंतु, या गंभीर प्रश्नावर लोकप्रतिनिधी मात्र गप्प असून कुणालाही खंत नसल्याचे तालुक्यात चित्र आहे.सध्या थंडीचा जोर वाढत चालला असून शेतशिवारामध्ये रब्बी पिकांना ओलिताचे काम सुरू आहे. दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला मात्र दिवसा वीज कमी मिळत असल्याने रात्री जागरण करीत पिकांना पाणी द्यावे लागते निसर्गापाठोपाठ विद्युत वितरणही शेतकऱ्यांच्या जिवावर उठले असून शेतकऱ्यांनीच रात्रभर का जागावे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे निसर्गाच्या असमतोलामुळे सततच्या ओला व कोरडा दुष्काळ आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचे संकट उभे आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने शेती आणि शेतकरी यांच्या बाबत घेतलेले धोरण, काही निर्णय हे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत आहे.
तालुक्यात महावितरणकडून शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवस व रात्री असा वीजपुरवठा केला जातो. त्यातच दिवसा होणाऱ्या वीजपुरवठा तांत्रिक दुरुस्ती नावाखाली तासनतास खंडित असतो. रात्री ओलितासाठी शेतात जातांना शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन ओलित करावे लागते. शेतशिवारात वन्य प्राण्यांचा मुक्त संचार असतो. हे वन्यजीव कधी शेतकऱ्यांवर हल्ला करतील याचा नेम नाही. त्यातच सर्प, विंचू यांच्या सोबतीने दहशतीत शेतकरी रात्रभर शेतात उभे राहून मोठ्या कष्टाने शेतात पेरलेले पीक जगवण्यासाठी हा संघर्ष अतितीव्र बनला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सिंचनाचे काम करताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
रात्रीला महावितरणचा वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर अनेक तांत्रिक बिघाड होत असतात. ते विजेची उपकरणे दुरुस्तीसाठी रात्रीच्या वेळी धावपळ करावी लागते. रात्री होणाऱ्या थ्री फेज वीज पुरवठ्यामुळे शेतातील पिकांना पाणी देणे धोक्याचे ठरत आहे. परिणामी शेतकरी वर्ग वीजवितरण कंपनीवर नाराजी व्यक्त करीत असून काबाडकष्ट करून शेतकऱ्यांना या गंभीर प्रकारामुळे जागरण करावे लागते.
शेतीसाठी रात्रीचा विद्युत पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

शेतकरी दिवसभर राबत असताना पिकाच्या सिंचनासाठी आता रात्रभर जागण्याची वेळ जगाच्या पोशिंद्यावर आली आहे. महावितरण कंपनी वारंवार शेतकरी विरोधी धोरण अवलंबित असून शेतकऱ्यांना नाहक त्रास देत आहे. बुलढाणा जिल्ह्याचे पालकत्व सांभाळणाऱ्या मंत्र्यांनी लोकप्रतिनिधींनीही याकडे तत्काळ लक्ष देऊन कृषिपंपांना सातही दिवस दिवसा वीज पुरवठा करावा. शेतातील पिके जगतील, तरच शेतकरी जगेल. अशी भावना शेतकरी व्यक्त करीत आहे.

 

हे खरोखर आपले ‘लोकप्रतिनिधी’ आहेत का?
… उत्तर सर्वांना माहीत आहेच, पण यामुळे शेतकऱ्यांच्या, दुर्बल घटकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतं आहे, मतदारसंघांचं नुकसानच होत आहे, हे स्पष्ट दिसत असूनसुद्धा मतदार जाब विचारण्याचा हक्क आपल्याकडे उरला आहे की नाही?
स्वप्निल देशमुख पत्रकार

Previous articleजिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यात उपाय योजना लागु करा 
Next articleचला पणती पेटवूया कही दिप जले कही दिल!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here