Home सामाजिक चला पणती पेटवूया कही दिप जले कही दिल!

चला पणती पेटवूया कही दिप जले कही दिल!

127
0

आशाताई बच्छाव

IMG_20231112_192934.jpg

चला पणती पेटवूया

कही दिप जले कही दिल!
अंगार कुणाचा चला पेटवू पणती
जरी जळून गेली या देहाची पणती || धृ ||

कुणी व्हा बाजूला तरी पेटतील सारे
जात विषमता नष्ट करूया वारे
कधी अंधाराला आग लागूनी जाळी
तरी नकाच लावू अंधश्रद्धेला भाळी
गाडूनी टाकू पुर्नजन्माची साडेसाती
अंगार कुणाचा चला पेटवू पणती || १ ||

झिजतील झोपडीत गरिबीचेही रंग
मढ़लोणी खाण्या खाटकसाई दंग
गरिबाला जगी या नाही कुणी हो वाली
सारूनी देऊया बाजू रूढ़ी रीती नी चाली
सुंदर होई जगण्याची ही रणनीती
अंगार कुणाचा चला पेटवू पणती || २ ||

मदमस्त मवाली जरी बाजूला चारी
उधळूनी लावूया खांदे भ्रष्टाचारी
या दलालपंथीला देऊन टाकू फाशी
उठतील पुन्हा जर हेही सत्यानाशी
घाव देऊनी पाजळू तलवारीच्या पाती
अंगार कुणाचा चला पेटवू पणती || ३ ||

या नराधमांचा ऊडवूनी टाकू माथा
या चुगलखोरांचा करूनी टाकू चोथा
मग जशा उपाशी राहतील यांच्या पिढी
ठेचूनी काढू सापांच्याही स्मशानातल्या शिडी
कशा निपजतील पुढच्या यांच्या नाती
अंगार कुणाचा चला पेटवू पणती || ४ ||

कवी,गीतकार, “पस्तावा”कार, अँड़-सोमदत्त मुंजवाड़कर
सटाणा ता.बागलाण,जि. नाशिक
मो.८०८७७३५३६९ संग्राहक – युवा मराठा न्यूज महाराष्ट्र 

Previous articleविज वितरणची असंवेदनशीलता….शेतकऱ्यांचे जीव संकटात! मानसिक यातनांची लोकप्रतिनिधींनाही खंत नाही!
Next articleहनुमान देवस्थान पंच कमिटी निमगाव व ग्रामस्थांच्या वतीने कुस्त्यांची आमदंगल कार्यक्रम संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here