Home नांदेड मुखेड प्रहार अपंग क्रांती संघटनेची नुतन कार्यकारणी जाहीर तालुकाध्यक्ष पदी शादुल कासार...

मुखेड प्रहार अपंग क्रांती संघटनेची नुतन कार्यकारणी जाहीर तालुकाध्यक्ष पदी शादुल कासार तर शहराध्यक्ष पदी पत्रकार संजय कांबळे यांची निवड !

61
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड प्रहार अपंग क्रांती संघटनेची नुतन कार्यकारणी जाहीर

तालुकाध्यक्ष पदी शादुल कासार तर शहराध्यक्ष पदी पत्रकार संजय कांबळे यांची निवड !

नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

मुखेड प्रहार जनशक्ती पक्ष प्रणित प्रहार अपंग क्रांती संघटनेची मुखेड कार्यकारणी नुकतच जाहीर करण्यात आली असून तालुकाध्यक्षपदी शादुल गुडूसाब कासार रा. जांब यांची तर शहराध्यक्षपदी पत्रकार संजय सुदामराव कांबळे रा. अशोक नगर मुखेड यांची सर्वानुमते फेर निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

मुखेड विश्रामगृह येथे प्रहार अपंग क्रांती संघटनेची बैठक दि. १० फेब्रुवारी रोजी पार पडून वरील नियुक्ती करण्यात आली आहे. प्रहार जनशक्ती पक्ष प्रणित प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या मुळ उद्देशाचे पालण करीत संघटनांच्या माध्यमातून अपंग व्यक्तींच्या सर्वांगीन विकासासाठी व अपंग व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी हाझटावे म्हणून वरील शादुल कासार व संजय कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी तालुक्यातील अंपग कार्यकर्त्यां सह
नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष श्रीराम पाटील पवार, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ हुंडेकर, नांदेड जिल्हा सचिव मारोती मुंगरुळे, नांदेड संपर्क प्रमुख राजुभाऊ इबितवार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here