Home नांदेड डॉ.राहुल कांबळे यांच्या ४५ तासाच्या अथक प्रयत्नानंतर सर्पदंश झालेल्या बैलाला मिळाले जीवनदान...

डॉ.राहुल कांबळे यांच्या ४५ तासाच्या अथक प्रयत्नानंतर सर्पदंश झालेल्या बैलाला मिळाले जीवनदान डॉ.राहुल कांबळे यांच्यावर तालुकाभरासह जिल्हाभरातून होतोय कौतुकाचा वर्षाव.

183
0

राजेंद्र पाटील राऊत

डॉ.राहुल कांबळे यांच्या
४५ तासाच्या अथक प्रयत्नानंतर
सर्पदंश झालेल्या बैलाला मिळाले जीवनदान

डॉ.राहुल कांबळे यांच्यावर तालुकाभरासह जिल्हाभरातून होतोय कौतुकाचा वर्षाव.

नांदेड/ मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

मुखेड तालुक्यातील मौजे बेरळी परिसरातील श्री.कोलमकर यांच्या फार्महाऊसवर हरभऱ्याच्या शेतामध्ये बैल चरत असताना बैलाला परड जातीच्या सापाने चावा घेतला व बैल अचानक बावचळ्या मुळे शेतकऱ्यांनी सापाला पाहताच शेतकऱ्यांनी जागीच घाबरून गेले व मालकाला फोन करून त्वरित सांगितलं मालकांनी वेळेत डॉक्टरांना बोलून बैलावर तात्काळ उपचार चालू केला त्यामुळे एक लाख रुपये किंमतीचा बैल तब्बल पंचेचाळीस तासाच्या प्रयत्नातून डॉ.राहुल कांबळे यांनी वाचवला सर्पदंश झालेल्या बैलांचा प्राण.
मराठवाडा सुप्रसिद्ध सर्पदंश तज्ञ डॉ.दिलीप पुंडे यांच्या मार्गदर्शनातून व जिल्हा तांत्रिक पशुसंवर्धन अधिकारी डॉ.गायकवाड यांच्या मार्गदर्शनातून सर्पदंश झालेल्या बैलाचा प्राण वाचवण्यात यश मिळाले. त्यामुळे डॉ.कांबळे यांचे बैलाचे मालक सेवानिवृत्ती नायब तहसीलदार श्री.कोलमकर यांनी डॉ.राहुल कांबळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करीत भरभरून कौतुक केले आहे.
डॉ.कांबळे हे तालुक्यातील अनेक सर्पदंश झालेल्या जनावरांचा प्राण त्यांनी वाचवला आहे त्यामुळे डॉ.राहुल कांबळे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनातून व उदगीर व्हेटर्नरी कॉलेज यांच्या माध्यमातून ते तालुक्यामध्ये पशुसेवा ही निस्वार्थपणे करतात. त्यांच्या या कार्याला तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांचे स्वागत करत त्यांच्यावर शाब्बासकीची थाप देत आहेत.
डॉक्टर राहुल कांबळे यांच्या या कार्यामुळे तालुकाभरासह संपूर्ण जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here