Home नांदेड भागवत पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेचा गुरुगौरव पुरस्कार प्रदान

भागवत पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेचा गुरुगौरव पुरस्कार प्रदान

166
0

राजेंद्र पाटील राऊत

भागवत पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेचा गुरुगौरव पुरस्कार प्रदान
नांदेड /मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क
नांदेड जिल्हा परिषदेचे सहशिक्षक श्री भागवत हणमंतराव पाटील बेळीकर यांना नुकताच जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा गुरू गौरव पुरस्कार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अशोकराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते नुकताच देण्यात आला.
भागवत पाटील हे एक हाडाचे शिक्षक असून गेल्या पंचवीस वर्षापासून ते ज्ञानदानाचे कार्य ग्रामीण भागामध्ये करत आहेत. भागवत पाटील हे एक अभ्यासू आणि तळमळीचे शिक्षक असून अनेक शैक्षणिक चळवळीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. एक कार्यक्षम शिक्षक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अशा या हरहुन्नरी शिक्षक नेतृत्वास नुकताच जिल्हास्तरीय गुरु गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी आ. अमर भाऊ राजूरकर .आ.मोहन अण्णा हंबर्डे ,माजी मंत्री डी. पी. सावंत साहेब ,आ. बालाजीराव कल्याणकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार अविनाश घाटे साहेब, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजयजी बेळगे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर,जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉ. मीनल ताई खतगावकर, शिक्षणाधिकारी बिरगे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. श्री भागवत पाटील यांना जिल्हास्तरीय गुरुगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे मुखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री व्यंकटराव माकणे ,गणेश पाटील बेळीकर ,शिक्षक नेते दिलीपराव देवकांबळे यशवंत बोडके ,शिवाजीराव इंगोले नामदेव सूर्यवंशी ,उद्धवराव सूर्यवंशी, मारुती सूर्यवंशी , बळवंत डावकरे ,गंगाधरराव वडगावे, सुरेश पाटील जाधव पद्माकर जवळदापके, कल्याणराव इंगळे ,शरद डावकरे शरद जोगदंड ,आनंद पाटील नकाते ,किशनराव इंगोले, हनुमंतराव इंगोले आदींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here