Home अकोला फिरता दवाखानाः गावोगावी नागरिकांची आरोग्य तपासणी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते उद्घाटन

फिरता दवाखानाः गावोगावी नागरिकांची आरोग्य तपासणी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते उद्घाटन

263

राजेंद्र पाटील राऊत

फिरता दवाखानाः गावोगावी नागरिकांची आरोग्य तपासणी
जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते उद्घाटन

अकोला,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : गावोगावी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करुन त्यांना औषधोपचार देण्यासाठी फिरते रुग्णालय आजपासून नागरिकांच्या सेवेत दाखल झाले. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

येथील रासी बियाणे या बियाणे उत्पादक कंपनीच्या सामाजिक उपयुक्तता निधी अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत फिरता दवाखाना ही संकल्पना राबविली जाणार आहे. त्यात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित असतील. शिवाय आवश्यक उपचार व औषधीही असतील. नागरिकांना गावोगावी जाऊन वैद्यकीय चाचण्या व उपचार सुविधा याद्वारे देणे शक्य होणार आहे. आज या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत, गुणनियंत्रक नितीन लोखंडे, कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, मोहिम अधिकारी मिलिंद जवंजाळ तसेच दिनेश शहा, मंदार सावजी, मुकेश राठी, दिलीप ठाकरे, पराग छलाणी, जयेश सदावर्ते, रासीचे जिल्हा व्यवस्थापक अनिल माहोरे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना पटोकार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, डॉ. मनिष शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा फिरता दवाखाना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सेवा देणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध होईल,असे मत यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी व्यक्त केले.

Previous articleमुखेडात नाम फाउंडेशन तर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना धनादेशाचे वाटप
Next articleभागवत पाटील यांना नांदेड जिल्हा परिषदेचा गुरुगौरव पुरस्कार प्रदान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.