Home अमरावती अमरावती जिल्ह्यातील तीन महापुरुषांच्या गावातील शाळांचा कायपालट होणार२ कोटीची निधी मंजुरात. ——————————-

अमरावती जिल्ह्यातील तीन महापुरुषांच्या गावातील शाळांचा कायपालट होणार२ कोटीची निधी मंजुरात. ——————————-

30
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231010-061432_WhatsApp.jpg

अमरावती जिल्ह्यातील तीन महापुरुषांच्या गावातील शाळांचा कायपालट होणार२ कोटीची निधी मंजुरात.
——————————-
दैनिक युवा मराठा वृत्त संकलन.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
पी.एन.देशमुख.
अमरावती
खडू, झाडू आणि खंजिरी अशी त्रिकूट म्हणून घ्या देशभर ओळख आहे, ते अमरावती जिल्ह्याचे शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख, राष्ट्रसंत गाडगेबाबा, व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावांचा शाळांच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने २कोटी ६लाख८हजार रुपये मंजुरात दिली असून खर्च करणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केलेल्या संकल्पची पूर्तता म्हणून हे पाऊल उचलण्यात आले असून ज्या शाळेच्या विकासासाठी ही रक्कम खर्च केली जात आहे, त्या सर्वांचे सर्वे शाळा तिन्ही शाळा जिल्हा परिषद च्या मालकीच्या आहेत.डाॅ. भाऊसाहेब पूर्व पंजाबराव देशमुख शिक्षण महर्षी यांची जन्मगाव असलेले अमरावती जिल्ह्यातील पापड तसेच राष्ट्रसंत गाडगेबाबांचे मूळ गाव या जिल्ह्यातील शेंडगाव व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे मोझरी येथील जिल्हा परिषद शाळांना त्या त्या महापुरुषांची नावे देण्यात आली आहे. परंतु मोजका निधी आणि भरपूर कामे या चक्रवात जिल्हा परिषद प्रशासनाला या शाळेकडे आतापर्यंत विशेष लक्ष देता आले नाही. त्यामुळेच राज्य शासनाने मदतीचा हात पुढे केला असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षा हे सर्व केली जात आहे. आमच्या विशेष प्रतिनिधीने प्राप्त केलेल्या माहितीसह नुसार पापड तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथील शिक्षण महर्षी कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विकासासाठी १ कोटी ७२ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचवेळी शेंडगाव तालुका अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथील संत गाडगेबाबा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी ४९ लाख ६८ हजार रुपये आणि मोझरी तालुका तिवसा जिल्हा अमरावती येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जिल्हा परिषद मुलींच्या शाळेच्या विकासावर ५५ लाख ६८ हजार रुपये खर्च केले जाणार आहे. दरम्यान महापुरुषांच्या गावातील शाळांचा दर्जा उंचविण्यासाठी राज्यभरातील शाळांच्या विकासात राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या यादीतही तसा उल्लेख करण्यात आला आहे. अमृत महोत्सवी वर्षात महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने ही मोहीम आखली असून त्यासाठी १४ कोटी ३० तर दूध करण्यात आली आहे. विशेष असे की या रकमेला अर्थ मंत्रालयाने सुद्धा मंजूर दिली आहे. त्या शाळांचा काय पालट करण्यासाठी लवकरच कार्यरंभ केला जाईल अशी माहिती मिळाली आहे.

Previous articleविद्यार्थ्यांनी स्वतःतील न्यूनगंड कमी करून आपल्या भाग्याचे शिल्पकार बनले पाहिजे – मॅनेजमेंट गुरु प्रशांत पुप्पल
Next articleआंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा श्री ह.व्या.प्र मंडळा मध्ये
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here