Home माझं गाव माझं गा-हाणं लाँकडाऊनच्या नावाखाली सर्रास व्यापाऱ्याचा काळाबाजार सुरु…!

लाँकडाऊनच्या नावाखाली सर्रास व्यापाऱ्याचा काळाबाजार सुरु…!

153
0

राजेंद्र पाटील राऊत

लाँकडाऊनच्या नावाखाली सर्रास
व्यापाऱ्याचा काळाबाजार सुरु…!
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगांव- काल मध्यरात्री पासुन लाँकडाऊन लावण्याच्या झालेल्या घोषणेनंतर येथील व्यापारी प्रतिष्ठाने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयगांव मार्कट व टेहरे मार्कट भागात काही व्यापाऱ्यानी साठेबाजी करीत काळाबाजाराचा कळस गाठलेला आहे.
ग्रामीण भागातून येणाऱ्या किरकोळ किराणा दुकानदारांना याचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे बोलले जात आहे.लाँकडाऊन काळातही सगळेच व्यवहार जर सुरळीत सुरु आहेत.तर मग बडया व्यापाऱ्याकडून हि लुटमारी कशासाठी?असा प्रश्न निर्माण होत आहे.कायद्याने बंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थमध्ये तर मोठया चढया भावाने लुटमारी सुरु आहे.टेहरे मार्कटमधील एका व्यापाऱ्याकडून तर काहीनी पोतेच्या पोते तंबाखूजन्य माल उचलल्याची जोरदार चर्चा असून,मग प्रशासन या अवैध काळाबाजारी कृत्य करणाऱ्यांवर नेमकी काय कारवाई करणार आणि कधी?याकडे संपूर्ण तालुका वासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here