• Home
  • अभिजीत गायकवाड यांचा सहपत्नी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केला सन्मान

अभिजीत गायकवाड यांचा सहपत्नी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केला सन्मान

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210117-WA0063.jpg

कोल्हापूर :पेठ वडगांव येथील श्री.शाहू शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे कार्यवाहक श्री.अभिजीत गायकवाड सहपत्नी यांना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते आदर्श लिपिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
शिक्षण तज्ञ कै.डी. बी. पाटील शैक्षणिक विचार मंचतर्फे आयोजित पुरस्कार वितरण
सोहळा काल कोल्हापूर शहरातील महाराष्ट्र हायस्कुलच्या प्रांगणात पार पडला यावेळी आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक, आदर्श शिक्षकेतर , आदर्श लिपीक कर्मचार्‍यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव केला.
सत्कार समारंभाच्या प्रमुख पाहुण्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या होत्या तर अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व प्रमुख उपस्थिती कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील हे होते .
याप्रसंगी मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, आगामी काळात संबंधित शिक्षकांचे शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तावाढीचे प्रयत्न, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि पटसंख्या वाढीसाठी योगदान याबाबत प्रत्यक्ष अथवा संकेतस्थळाच्या माध्यमातून सादरीकरण करावे लागेल.
यापुढे गुणवत्तेवरही काम करावे लागेल. त्यातुनच आदर्श शाळा निर्माण केल्या जातील. त्यासाठी शैक्षणिक क्षेत्रातील विविध घटकांचे सहकार्य अपेक्षित आहे.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ३४ वर्षानंतर देशाला नवे शैक्षणिक धोरण प्राप्‍त झाले आहे. अभ्यासक्रम वेगळ्या पद्धतीने येतो का, याची चर्चा झाली पाहिजे. त्यासाठी शिक्षण संस्थांनी चार पावले पुढे आले पाहीजे.
यावेळी आमदार जयंत आसगांवकर, प्राचार्य डी. एस. घुगरे आणि दीपक शेटे यांच्यासह आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक, आदर्श शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव केला. यावेळी आ. जयंत आसगावकर, आ. चंद्रकांत जाधव, माजी. आमदार मालोजीराजे छत्रपती यांची भाषणे झाली. स्वागत व प्रास्ताविक शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील शैक्षणिक विचारमंचचे अध्यक्ष व्ही. जी. पोवार यांनी केले. कार्यक्रमास आ. राजूबाबा आवळे, आ. राजेश पाटील, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन आर. डी. पाटील, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे बी. जी.बोराडे, एस. डी. लाड, डी. जी. किल्‍लेदार, भैया माने, वसंतराव देशमुख, बळवंतराव यादव हायस्कुल व ज्युनियर काँलेजचे प्राचार्य प्रदिप पाटील सर , उपप्राचार्य किरण कोळी सर , शिक्षक शिक्षिकेतर व सर्व स्टाफ व वडगांव शहरातील मित्र परिवार तसेच पत्रकार सुहास जाधव , विवेक दिंडे , सचिन पाटील , छायाचित्रकार संतोष माळवदे ,शइंजिनियर रायसिंग भोसले , डाँ.सचिन पवार सर, इंद्रजीत जाधव पाटील , अजित पाटील , शशिकांत पिसे ,सुनिल लाड , राष्ट्रवादीचे आप्पासाहेब पाटील, माजी.नगराध्यक्ष अभिजीत पोळ , पी.बी.पाटील सर , नंदकुमार पाटील सर , रमेश पाटील, अंकुर भोरे ,इंजिनियर प्रथमेश महाजन , मयुर गायकवाड व अभिजीत गायकवाड युवा मंचचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment