Home पश्चिम महाराष्ट्र मंगळवेढ्यात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात , दिवसभरात ‘ एवढ्या ‘ कोरोना योद्ध्यांना...

मंगळवेढ्यात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात , दिवसभरात ‘ एवढ्या ‘ कोरोना योद्ध्यांना दिली लस

107
0

राजेंद्र पाटील राऊत

मंगळवेढ्यात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात , दिवसभरात ‘ एवढ्या ‘ कोरोना योद्ध्यांना दिली लस
युवा मराठा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी महादेव घोलप.
सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील
मंगळवेढा तालुका ग्रामीण रुग्णालयात शनिवारी स्वछता व उत्साहवर्धक वातावरणात कोविशिल्ड लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला . लसीकरण मोहिमेसाठी एकूण 953 डॉक्टर्स , नर्स , आरोग्य कर्मचारी , आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांची नोंदणी करण्यात आली आहे . त्यापैकी ग्रामीण रुग्णालयात एकूण 520 लशी उपलब्ध झाल्या आहेत . त्यातील आज पहिल्या दिवशी एकूण 102जणांना लस देण्यात आली आहे . यावेळी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते , उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील , पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी रुग्णाल याला भेट देऊन आढावा घेतला. अधीक्षक डॉ.प्रमोद शिंदे , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नंदकुमार शिंदे , गटविकास अधिकारी सौ.सुप्रिया चव्हाण , वैद्यकीय अधिकारी डॉ.पद्माकर आहिरे , वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण पथक डॉ.सुमित्रा तांबारे , समन्वयक आदींची प्रमुख उपस्थिती होती .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here