Home पुणे गजानन मारणे तुरुंगातून सुटताच पुन्हा अटक ! मिरवणूक प्रकरण भोवले…

गजानन मारणे तुरुंगातून सुटताच पुन्हा अटक ! मिरवणूक प्रकरण भोवले…

208
0

राजेंद्र पाटील राऊत

पुणे 18 फेब्रुवारी ⭕युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे⭕
पुणे _ पुन्हा अटक करण्यात आले. आज त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळेस मारणेची बाजू त्याचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी मांडली. मीडियानं मला गुंड म्हटलं आहे, माझ्याविरोधात कुठलाच गुन्हा नाही. अशी मारणेची बाजू मांडण्यात आली.

काय झालं कोर्टात?
मारणेने आपली बाजू मांडताना काही प्रश्न न्यायालयात विचारले.

”पोलिसांनी सुरुवातीला का अडवलं नाही? काल हायवेला हजारो गाड्या होत्या त्यात माझ्या पाचशे गाड्या होत्या हे कशावरून? असे प्रश्न मारणेतर्फे उपस्थित करण्यात आले आहेत. तसेच एकाही व्यक्तीची दहशत दाखवल्याची तक्रार केलेली नाही.

जर गुन्हाच घडला नाही तर कट कसला आणि मनात एखादा गुन्ह्याचा विचार आला म्हणजे कट होतो का? अशी बाजू मारणेतर्फे मांडण्यात आली आहे. आपल्यावर राजकीय कारणामुळे हे गुन्हे दाखल केले आहेत,” असंही त्याने म्हटले आहे.

गजानन मारणेला न्यायालयात हजर करणार, सुटकेनंतर पुन्हा पडल्या होत्या बेड्या
गजानन मारणेच्या पत्नीने जेव्हा मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती
गजानन मारणे आणि पुण्यातल्या इतर टोळ्यांची कथा सांगणारा मुळशी पॅटर्न
“राज्यात जेव्हा राजकीय मेळावे घेतले तेव्हा pandamic situation नव्हती का? पोलिसांनी कोणती जमावबंदीची घोषणा केली होती का? तसेच जमावबंदीचे उल्लंघन जामीनपात्र आहे. मी कोणतेही शस्त्र बाळगले नाही आणि जेलमध्ये असताना कट कसा करेन?” असे प्रश्न मारणेतर्फे विचारण्यात आले आहेत.

तसेच मी “तळेगावच्या पुढे एका गाडीने कोथरूड पोलीस स्टेशन हजर झालो आहे,” अशीही त्याने बाजू मांडली आहे.

काय आहे प्रकरण?
खुनाच्या गुन्ह्यातून मुक्तता झाल्यानंतर नवी मुंबई येथील तळोजा कारागृहातून गजानन मारणेची सोमवारी (15 फेब्रुवारी) सुटका करण्यात आली. यावेळी मारणेच्या स्वागतासाठी कारागृहाबाहेर त्याचे शेकडो कार्यकर्ते जमले होते. त्यानंतर तळोजा ते पुणे अशी मारणेची मिरवणूक काढण्यात आली.

साधारण तीनशेच्या आसपास चारचाकींचा ताफा मारणे याच्यासोबत पुण्यात आला. याचे व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

यादरम्यान, कोरोनाचे सर्व नियम धुडकावून लावून दिल्याचे समोर आले. याप्रकरणी आता मारणे आणि त्याच्या साथीदारांवर दहशत पसरविल्याचा गुन्हा तळेगाव दाभाडे पाोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गजानन मारणे कोण आहे?
गेल्या काही वर्षांमध्ये पुणे शहर आणि आसपासच्या जमिनींना भाव आला. मुंबईचे अनेक बांधकाम व्यावसायिक पुण्याकडे वळू लागले. त्यातून जमीन – खरेदीच्या व्यवहारातून टोळ्या तयार होऊ लागल्या.

 

जमीन मालक आणि बांधकाम व्यवसायिक यांच्यातील मिडल मॅन म्हणून या टोळ्या काम करू लागल्या. त्यासाठी त्यांनी टक्केवारी ठरवली होती. या व्यवहारांमधील वर्चस्वातूनच पुढे निलेश घायवळ आणि गजानान मारणे यांची टोळी निर्माण झाली. या दोन टोळ्यांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यातून अनेक संघर्ष झाले. त्यातूनच खुनाची अनेक प्रकरणं समोर आली.

पप्पू गावडे आणि अमोल बधेच्या खूनाच्या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी गजानन मारणे आणि त्याच्या साथीदारांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली. परंतु त्यांच्याविरोधात सबळ पुरावे आणि साक्षीदार उभे करु न शकल्याने न्यायालयाने मारणे आणि त्याच्या साथीदारांची मुक्तता केली.

पप्पू गावडे याच्या खून प्रकरणात गजानन मारणे आणि त्याच्या अन्य साथीदारांवर पौड येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सबळ पुराव्यांअभावी पुण्यातील विशेष मोक्का न्यायालयाने 12 फेब्रुवारीच्या सुनावणीत मारणे आणि त्याच्या साथीदारांची मुक्तता केली.

गजानन मारणे
फोटो स्रोत,FACEBOOK
2014 साली मारणे आणि त्याच्या साथीदारांना अटक झाली होती.

3 नोव्हेंबर 2014 रोजी लवाळे गावाच्या हद्दीतील गावडे वस्तीजवळ पूर्वीच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी पप्पू उर्फ संतोष हिरामण गावडे याचा खून झाला होता.

गजानन मारणे आणि निलेश घायवळ यांच्या टोळ्यांमध्ये पूर्वीपासून कोथरुड व मुळशी तालुक्यातील जमिनीचे खरेदी विक्रीचे जुने वाद आहेत. या वादातून त्यांनी एकमेकांवर खुनी हल्ले केले आहेत.

याआधी देखील 2008 साली निलेश घायवळ आणि संतोष गावडे यांच्यावर गजानन मारणे, पप्पू कुडले व त्यांच्या साथीदारांनी फायरिंग करुन व कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

पप्पू गावडे याने दिलेल्या फिर्यादीवर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात साक्ष दिल्यास संपवून टाकण्याची धमकी पप्पू गावडे याला दिली होती. त्यातूनच पप्पू गावडेचा खून करण्यात आला होता.

2 फेब्रुवारीला देखील पुण्यातील मोक्का न्यायालयाने अमोल बधेच्या खून प्रकरणातून गजानन मारणे आणि त्याच्या 20 साथीदारांची पुराव्याअभावी मुक्तता केली. याप्रकरणी संतोष कांबळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. कांबळे आणि खून झालेला बधे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. दोघेही निलेश घायावळ टोळीचे सदस्य आहेत.

Previous articleमुखेड तालुक्यातील मौजे राजुरा तांडा येथे राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची 282 वी जयंती उत्साहात साजरी..
Next articleबागलाण पुर्व भागात वादळी वार्यासह जोरदार पाउस 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here