Home मुंबई आपल्या आठ बहिणभावांसह झोपडपट्टीत राहायचे गौतम अदानी…! आज आहेत अब्जाधीश

आपल्या आठ बहिणभावांसह झोपडपट्टीत राहायचे गौतम अदानी…! आज आहेत अब्जाधीश

155
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 आपल्या आठ बहिणभावांसह झोपडपट्टीत राहायचे गौतम अदानी…! आज आहेत अब्जाधीश 🛑
✍️ उद्योग क्षेत्र विशेष 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

असे म्हटले जाते की वेळ बदलण्यास वेळ लागत नाही, आज एखादा माणूस जर खुप हालाखीचे जीवन जगत असेल तर त्याचे जीवन कधी पालटेल सांगता येत नाही. आपल्या आजूबाजूला असे बरेच लोक आहेत ज्यांच्यावर ही गोष्ट उत्तम प्रकारे बसते. अशा लोकांच्या यादीमध्ये देशातील यशस्वी उद्योजक गौतम अदानी यांचेसुद्धा नाव आहे.

आज त्यांचा व्यवसाय त्यांचा व्यवसाय जगभरात पसरलेला आहे. कोळसा व्यापार, खाण, तेल आणि गॅस वितरण, बंदरे, लॉजिस्टिक, वीजनिर्मिती-प्रसार असा खुप मोठा विस्तारलेला त्यांचा बिझनेस आहे. पण एक काळ असा होता की त्यांना एक वेळचे जेवणसुद्धा मिळत नव्हते. त्यांना त्यासाठी खुप कष्ट करावे लागत होते.
भारतातील काही निवडक अब्जाधिशांमध्ये त्यांचे नाव आहे. त्यांचा जन्म अहमदाबादच्या गुजराती जैन कुटुंबात २४ जून १९६२ रोजी झाला होता. गौतम अदानी हे त्यांच्या ८ भावंडासोबत राहायचे. त्यांची परिस्थिती इतकी बिकट होती की कोणीही म्हणणार नाही हा माणूस पुढे जाऊन इतकी प्रगती करेल.

१९८० च्या दशकात, अदानी त्यांच्या अहमदाबाद शहरातील बालपणातील साथीदार मलय महादेवीसोबत त्याच्या स्कुटरवर हिंडायचे. त्यांचे वडील आणि ते एका चाळीत राहात होते. गौतम अदानी यांनी प्राथमिक शिक्षण अहमदाबादच्या सीएन विद्यालयात केले. त्यांनी पदवीसाठी गुजरात विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला, पण तो अभ्यास ते पुर्ण करू शकले नाही. महाविद्यालयीन काळात त्यांना असे वाटत होते की अभ्यास आपल्याला जमणारच नाही.

ग्रॅज्युएशनच्या दुसर्‍या वर्षांत जेव्हा त्यांनी कॉलेज सोडून दिले तेव्हा सगळ्यांना धक्का बसला होता. खिशात अवघ्या १०० रुपये घेऊन अदानी स्वप्नांच्या शहरात म्हणजे मुंबईत पोहोचले. येथे, त्यांना महिंद्र ब्रदर्सच्या मुंबई शाखेत पहिली नोकरी मिळाली होती. येथे ते हिरे वेगळे करण्याचे काम करत असत.

व्यवसाय शिकत असताना, अदानी देखील त्यांच्या डोक्यात एक रणनिती आखत होते.

मुंबईतील सर्वात मोठी दागिन्यांची बाजारपेठ झवेरी बाजारात अदानी यांनी हिरा दलाली सुरू केली. आपल्या मेहनतीने अदानी यांनी आपले भविष्य घडवले.
अशा वेळी जेव्हा त्यांचे कुटुंब आर्थिक अडचणींसह झगडत होते, तेव्हा त्यांनी महाविद्यालय सोडण्याचा निर्णय घेतला आणि स्वत: चा मार्ग निवडला. त्यांचे वडील शांतीलाल अदानी त्यांच्या या निर्णयामुळे अजिबात खूष नव्हते. पण अदाणी यांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही त्यांनी आपल्या मनासारखे करायचे ठरवले होते.

अदानी यांनी स्वतःच्या दमावर अदानी पॉवर लिमिटेड कंपनी सुरू केली. त्यांच्या यशाचा अंदाज लावला जाऊ शकतो की फोर्ब्सच्या पहिल्या १० भारतीयांमध्ये त्यांचा समावेश होता. २०१९ च्या आकडेवारीनुसार, त्यांची मालमत्ता १,१०० करोड युएस डॉलर्स आहे.

१९८८ मध्ये अदानी समूहाची स्थापना झाली. सुरुवातीच्या वर्षात, गटाचे लक्ष ऍग्रो कमोडिटी आणि पॉवरवर होते. १९९१ पर्यंत कंपनी दोन्ही व्यवसायात अधिक चांगली कामगिरी करत होती परंतु इतर व्यवसायात येण्याची हीच योग्य वेळ असल्याचे अदानींना जाणवले.

मग त्यांनी अनेक व्यवसायात आपला पाया रोवला. त्यांनी अनेक व्यवसाय उभे केले.

आज ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीमंधील एक व्यक्ती आहेत.⭕

Previous articleपुतण्या तन्मय फडणवीसमुळे देवेंद्र फडणवीस आले गोत्यात 🛑
Next articleपालघर जिल्हात जंबो कोविड सेंटर उभारण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचे निवेदन.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here