Home मुंबई पुतण्या तन्मय फडणवीसमुळे देवेंद्र फडणवीस आले गोत्यात 🛑

पुतण्या तन्मय फडणवीसमुळे देवेंद्र फडणवीस आले गोत्यात 🛑

123
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 पुतण्या तन्मय फडणवीसमुळे देवेंद्र फडणवीस आले गोत्यात 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕राज्यात सध्या राजकीय शाब्दीक बाचाबाचीला उत आलेला आहे.

रेमेडिसेव्हर तसेच लसीच्या तुटवड्यावरून भाजप आणि शिवसेना एकमेकांवर टिका करत आगपाखड करत आहेत.खरतर राज्यात महाविकास आघाडीच सरकार आहे परंतु एकमेकांना पाण्यात पाहण्याच काम भाजप,शिवसेना हे पक्ष करत आहेत.एकेकाळी हे पक्ष युतीत होते,मित्रपक्ष होते परंतु राजकारणात सत्तेची समिकरण बदलतील तस सर्वच बदलत असत.

नुकतीच देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी शिवराळ भाषेत टिका केली होती.

त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी ब्रुक फार्माच्या राजेश डोकनियांची मध्यस्थी करत सुटका केली होती,त्यावरूनही त्यांच्यावर टिकेची झोड उठली होती.सध्या मात्र फडणवीस घरगुती कारनाम्यान गोत्यात आलेत.विरोधी नेत्यांवर घराणेशाहीबाज अशी टिका केलेल्या फडणवीसांची घराणेशाही बाहेर आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे तरुण पुतणे तन्मय फडणवीस यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेले आहेत आणि त्याचे फोटोही सोशल मिडियावर शेअर केले आहेत.देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे ४५वर्षांवरील नसूनसुध्दा त्यांनी या दोन लसी कुठून घेतल्या? की ते ४५वर्षांवरील आहेत? अशी उपरोधिक टिका त्यांच्यावर सुरू झाली आहे.काही जणांनी तुम्ही रेमेडिसेव्हरचा साठा केलात तसा लसींचाही साठा करून ठेवला आहात का?असा प्रश्न विचारला आहे.

दरम्यान राज्यात लोक लसीकरणा अभावी खोळंबून असताना देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबातील १८वर्षांवरील सर्व सदस्य लसीकरण करून मोकळे झाले असाही उपरोध काहीजणांनी केला आहे.

तसच एकान धन्यवाद तन्मय फडणवीस तुमच्यामुळ केंद्राला १८वर्षावरील सर्वांना लसीकरण करण्याची कल्पना सुचली अशी बोचरी टिका केलेली आहे. ⭕

Previous articleचित्रपटसृष्टीत ‘सन्नाटा’; किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाने निधन 🛑
Next articleआपल्या आठ बहिणभावांसह झोपडपट्टीत राहायचे गौतम अदानी…! आज आहेत अब्जाधीश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here