Home Breaking News *देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज स्मारकाच्या भूमिपूजन समारंभास महामहीम राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना...

*देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज स्मारकाच्या भूमिपूजन समारंभास महामहीम राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना निमंत्रण-नगराध्यक्ष सुनील मोरे यांची माहिती*

119
0

*देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज स्मारकाच्या भूमिपूजन समारंभास महामहीम राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना निमंत्रण-नगराध्यक्ष सुनील मोरे यांची माहिती*
सटाणा,(जगदिश बधान प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
(सटाणा)बागलाण तालुक्याचे आराध्य दैवत संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज स्मारकाच्या भूमिपूजन समारंभास महाराष्टाचे राज्यपाल महामहिम भगतसिंग कोश्यारी यांना निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली.देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांचे स्मारक व्हावे यासाठी तालुक्यातील जनतेची अनेक वर्षांपासून ची इच्छा होती.त्यानुसार नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून स्मारक आता प्रत्यक्षात साकारणार असून या माध्यमातून महाराजांचा कार्याचा इतिहास जनतेपर्यंत पोहचावा यासाठी मंदिरा शेजारील जुन्या तहसीलदार कचेरीत ऐतिहासिक स्मारक निर्माण केले जाणार आहे,सदर ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा तालुका पशु वैद्यकीय दवाखाना होता,सदर दवाखाना नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या पाठपुराव्याने 2011 साली तत्कालीन उपमुख्यमंत्री ना.छगनराव भुजबळ यांच्या माध्यमातून शहरा शेजारील मळगाव येथे स्थलांतरीत करण्यात आला व त्यासाठी निधी देऊन आधुनिक पद्धतीचा दवाखाना देखील साकारला.दरम्यान महाराजांच्या स्मारकासाठी निधी मिळावा म्हणून तत्कालीन पर्यटन मंत्री आ.जयकुमार रावल,व माजी केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री व खा.डॉ सुभाष भामरे यांच्या माध्यमातून राज्य शासनाने नगर परिषदेस निधी मंजूर केला असून,लवकरच प्रत्यक्षात स्मारकाचे काम सुरू होणार आहे.यासाठी स्मारकाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे.त्यात प्रामुख्याने महारांजाच्या जुन्या स्मृतींना उजाळा मिळणार असून तैल चित्र शिल्पाच्या सहाय्याने जीवनपट साकारणार असल्याने त्यामुळे स्मारकास नवा आयाम मिळणार आहे.दरवर्षी भरणाऱ्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने लाखो भाविक शहरात येत असतात,त्यांना देखील स्मारकाच्या माध्यमातून महारांजांचे कार्य व्यापक स्वरूपात अनुभवास मिळणार आहे. सटाणा शहरात हे भव्य दिव्य स्मारक तयार झाल्यास तालुक्याच्या पर्यटन वाढीस मदत होईल व शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊन,शहराच्या वैभवात भर पडणार असल्याचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी सांगितले.यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांनी देवमामलेदार यशवंतराव महारांजांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा पगडी,यशवंत लिलामृत
ग्रंथ,पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.महारांजाच्या कार्याविषयी ऐकून घेतल्या नंतर समाधान व्यक्त केले व बोलतांना म्हंटले की देशातील सर्वच अधिकाऱ्यांना हे स्मारक प्रेरणादायी ठरेल असा आशावाद व्यक्त केला त्यामुळे सदर कार्यक्रमास येण्यास निश्चित पणे आनंद होईल,व त्यासाठी स्वतंत्रपणे वेळ देण्यात येईल असे सांगितले.विशेष म्हणजे पंधरा मिनिटे झालेल्या चर्चेत तालुक्यातील शेती सिंचन,विकासकामे,व ऐतिहासिक महत्त्व देखील जाणून घेतले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड, ऍड.दिपक सोनवणे,प्रा.वैभव गांगुर्डे, अभिजित बागड आदी उपस्थित होते.

Previous article#याला म्हणतात खरं #प्रेम#
Next articleआटपाडी तालुक्यात सत्तर लाखांचा मोदी बकरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here