Home पश्चिम महाराष्ट्र आमदार प्रणिती शिंदे लवकरच कॅबीनेट मंत्री होणार” 🛑

आमदार प्रणिती शिंदे लवकरच कॅबीनेट मंत्री होणार” 🛑

194

राजेंद्र पाटील राऊत

🛑 “आमदार प्रणिती शिंदे लवकरच कॅबीनेट मंत्री होणार” 🛑
✍️ सोलापूर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

सोलापूर :⭕सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे लवकरच महाराष्ट्राच्या मंत्रिपदी विराजमान होणार असल्याचा दावा काँग्रेस नेते आणि कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केलाय.

सोलापुरातील कॉंग्रेसच्या मेळाव्यात बोलताना विश्वजीत कदम यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या मंत्रीमंडळ प्रवेशाबाबत भाष्य केले आणि शिंदे समर्थकांना आश्चर्याचा धक्का दिला.

प्रणिती शिंदे लवकरच कॅबीनेट मिनिस्टर
यावेळी बोलताना विश्वजीत कदम म्हणाले, आमदार प्रणिती शिंदे आमच्यासोबत मंत्रीमंडळात नाहीत याची खंत वाटते. मात्र कदाचित लवकरच प्रणिती शिंदे या राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्रीच नव्हे तर कॅबिनेट मंत्री होतील असे विधान त्यांनी केले.
विश्वजीत कदमांच्या विधानाने प्रणिती समर्थकांचा टाळ्या.

विश्वजीत कदम यांच्य विधानाने उपस्थित शिंदे समर्थकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या विधानाचे स्वागत केले. आमदार प्रणिती शिंदे यांना मोठा वारसा आहे, जनताही त्यांना निवडून देते, मात्र काँग्रेस पक्षाने त्यांना एकदाही मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली नाही. खरं तर विश्वजीत कदम सोलापुरात आढावा बैठकीसाठी आले होते. पण त्यांनी संघटनेतील कार्यकर्त्यांनाही चार्ज केल्याची चर्चा पाहायला मिळाली. ⭕

Previous articleआला रे आला ‘ तुमचा बाप आला’ ही आरोळी महागात; पोलिसांनी एक वर्षासाठी केलं स्थानबद्ध 🛑
Next articleवाघ,विंचू,साप,अस्वल जंगली जनावर चावल्याने मृत्यू झाला: सरकार देणार १० लाख रूपये…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.