Home मुंबई शिवरायांच्या पादुकांचा होणार डोक्यावरुन प्रवास! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक घोषित!

शिवरायांच्या पादुकांचा होणार डोक्यावरुन प्रवास! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक घोषित!

76
0

⭕ शिवरायांच्या पादुकांचा होणार डोक्यावरुन प्रवास!
पालखी सोहळ्याचे वेळापत्रक घोषित! ⭕


मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई : हिंदवी स्वराज्याची तिसरी राजधानी दुर्गदुर्गेश्वर रायगडहून पंढरीच्या विठोबाच्या भेटीस दरवर्षी जाणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पालखीचे प्रस्थान नित्य प्रथेप्रमाणे ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी, श्री राज्याभिषेक शक ३४७, यावर्षी ९ जून २०२० रोजी सकाळी ठीक ८ वाजता रायगडावरील छत्रपती श्री शिवाजी महाराज समाधी स्थानाहून होणार आहे.
वाडेश्वर-जगदीश्वराचे व शिर्काईचे दर्शन घेऊन राजसदर-होळीचा माळ, रायगडाहून प्रस्थान केल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पादुकांचा पहिला विसावा पाचाडमधील राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या समाधी छत्रीजवळ असेल. आऊसाहेबांचा आशीर्वाद व निरोप घेऊन सोहळा पहिल्या मुक्कामी पळसगाव खुर्दमधील मारुती मंदिरात येईल.
दुसºया दिवशीचा मुक्काम श्रीरामपूरमध्ये करून तिसºया दिवशीच्या मुक्कामास ऐतिहासिक ताम्हिणी घाटातील जुन्या ऐतिहासिक पाऊलवाटेने पुणे जिल्ह्याच्या सीमेवर मुळशी तालुक्यातील आदरवाडी गावात हा सोहळा येईल. तेथून मजलदरमजल करत ज्येष्ठ शुद्ध दशमी, १५ जूनला तुकोबारायांच्या पालखी मार्गावर सामील होण्यासाठी पुण्यात दाखल होईल.
भागवत धर्माचे संस्थापक संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, माऊलींच्या वारीचे जनक तुकाराम महाराज व हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या भेटीचा उत्सव हडपसरला १६ जूनला होईल. मग पालखी सोलापूर महामार्गाने दौंड, माळेगाव, बारामती, इंदापूर, अकलूज, तोंडले-बोंडले, भाळवणी, गादेगाव मार्गे आषाढ शुद्ध दशमी, ३० जूनला पांडुरंगाच्या दर्शन ओढीने पंढरपुरात मुक्कामी पोहोचेल. आषाढी वारीचा सोहळा आटोपून गुरुपौर्णिमेसच राष्ट्रसमर्पण अभिवादन असल्याने शिवरायांच्या पालखीचा परतीचा प्रवास वाहनाने होऊन तीन मुक्कामात ४ जुलैला पुन्हा रायगडी दाखल होईल़

Previous articleकोरोनाचे संकट ! मुंबईतून येणाऱ्यांसाठी अशी केली जातेय व्‍यवस्‍था !
Next articleसर्व दुकाने, मार्केट रिक्षा, एस टी आजपासून सुरू!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here