Home बीड परळीत राज्यातील पहिल्या दिव्यांगाच्या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते संपन्न

परळीत राज्यातील पहिल्या दिव्यांगाच्या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते संपन्न

23
0

आशाताई बच्छाव

IMG_20240210_073302.jpg

परळीत राज्यातील पहिल्या दिव्यांगाच्या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते संपन्न

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड/परळी दि:०९  रोजी बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील पहिले दिव्यांगाच्या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन दिव्यांग मंत्रालय उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांच्या शुभहस्ते अतिशय उत्साहात संपन्न झाले.
राज्याचे कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे त्यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या या शिवभोजन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी नायब तहसीलदार श्री.बाबुराव रुपनर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष वैजनाथ सोळंके, माजी उपनगराध्यक्ष आयुब पठाण, डॉ प्रवीण खाडे, मनसेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, नाभिक समाजाचे नेते सुरेंद्र कावरे, नगरसेवक शेख शंमु, अखिल भारतीय वारकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर महाराज कोकाटे, डिजिटल मीडिया परिषदेचे तालुकाध्यक्ष नितीन ढाकणे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रस्ताविक सुरेंद्र कावरे यांनी केले, राज्याचे कृषिमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे डॉ. संतोष मुंडे सतत दिव्यांगासाठी विविध उपक्रम राबवत असतात आणि दिव्यांगासाठी घेतलेले सामाजिक कार्य करण्याचा त्यांचा वसा ते अविरत जपत राहाणारे नेतृत्व म्हणून सर्वजण डॉ.संतोष मुंडे यांना पाहतात. आज पर्यंत दिव्यांगासाठी अहोरात्र कार्य करतोय आणि करत राहणार, असे उद्गार डॉ.संतोष मुंडे यांनी काढले तसेच सय्यद सुभान यांनी सुरू केलेल्या मराठवाडा शिवभोजनास त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि शिवभोजन केंद्रास असणारा शासनाचा कोटा वाढवून घेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असा शब्दही दिला. सय्यद सुभान यांची कार्य करण्याची तळमळ आणि परिश्रम पाहून त्यांना केंद्र सुरू करण्यास सहकार्य केले असे परळीचे नायब तहसीलदार बाबुराव रुपनर आपल्या मनोगत म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, मनसेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास जुबेर बाबा, सय्यद सकावत सर, सय्यद आबेद, संतोष आघाव, विठ्ठल साखरे, विष्णू आघाव, सय्यद असेच, इमरान शेख, सय्यद अशफाक आदींसह मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Previous articleपरळीत मुलीचा फोटो काढल्याने राडा; लोकमान्य रसवंती गृहातील घटना
Next articleमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन सोहळा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here