Home बीड परळीत मुलीचा फोटो काढल्याने राडा; लोकमान्य रसवंती गृहातील घटना

परळीत मुलीचा फोटो काढल्याने राडा; लोकमान्य रसवंती गृहातील घटना

86
0

आशाताई बच्छाव

IMG_20240210_072526.jpg

परळीत मुलीचा फोटो काढल्याने राडा; लोकमान्य रसवंती गृहातील घटना

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड/परळी दि:०९  रोजी शहरातील रसवंतीगृहांमध्ये आलेल्या ग्राहक मुलींचा फोटो व्हिडिओ करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त झाले.याच रसवंतीगृहामध्ये काम करणाऱ्या एका युवक कामगाराने या मुलींचा फोटो, व्हिडिओ घेण्याचे गृहणास्पद कृत्य केल्याने मोठा राडा झाल्याचे बघायला मिळाले. दरम्यान शहराचे मध्यवर्ती ठिकाण बाळकृष्ण रोडे चौकात हा प्रकार घडल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक व बघ्यांची गर्दी झाली होती.
प्राप्त माहितीनुसार, उपजिल्हा रुग्णालयाजवळ मुख्य रस्त्यावरच असलेल्या लोकमान्य रसवंतीगृहांमध्ये सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या दरम्यान दोन मुली रस पिण्यासाठी बसलेल्या असताना याच रसवंतीगृहात काम करणारा एक युवक कामगार वारंवार त्यांच्या टेबल जवळून मोबाईल हातात धरून ये-जा करत होता ही बाब एका मुलीच्या लक्षात आल्याने तिने आपल्या पालकांना ही बाब कळवली.
पालकांनी घटनास्थळी तात्काळ येऊन शहानिशा केली असता या रसवंतीगृहात काम करणाऱ्या कामगाराने मोबाईल मध्ये फोटो व व्हिडिओ शूट केल्याचा प्रकार समोर आल्याने संतप्त नागरिकांनी त्या कामगाराला व रसवंती मालकाला चांगला चोप दिला. या घटनेने नागरिक संतप्त झाल्याने रसवंतीगृहात काही वेळातच मोठा जमाव जमा झाला व काही काळ या ठिकाणी राडा सुरू होता. दरम्यान मध्यवर्ती ठिकाणी हा प्रकार घडल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांची व बघ्यांची गर्दी झाली होती, मोठ्या संख्येने जमाव जमा झाल्याची माहिती मिळताच संभाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Previous articleयुवकांचा ध्यास ग्राम – शहर विकास-विशेष युवक शिबिराचे समारोप संपन्न.
Next articleपरळीत राज्यातील पहिल्या दिव्यांगाच्या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here