Home जालना जागतिक एडस दिनानिमित्त जनजागृतीपर रॅली उत्साहात संपन्न

जागतिक एडस दिनानिमित्त जनजागृतीपर रॅली उत्साहात संपन्न

79
0

आशाताई बच्छाव

IMG_20231202_181047.jpg

जागतिक एडस दिनानिमित्त जनजागृतीपर रॅली उत्साहात संपन्न

 

जालना  (दिलीप बोंडे) :- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे जागतिक एड्स दिन म्हणून साजरा करण्यासाठी शुक्रवार दि.1 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते जनजागृतीपर रॅलीला हिरवी झेंडी दाखवून जिल्हा रुग्णालय जालना येथून मार्गस्थ करण्यात आले.

प्रभात फेरीच्या उ‌द्घाटनाप्रसंगी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन. जी. पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मेश्राम, नोडल अधिकारी डॉ. प्रशांत बांदल, वैद्यकिय अधिक्षक डॉ. राजेंद्र गायके, क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश काकड, नर्सिंग स्कुल प्राचार्य श्रीमती जाधव, वरीष्ठ वैद्यकिय अधिकारी/जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. मनिष सहानी,  मनिष जाधव, यांच्यासह डापकु , एआरटी, आयसीटीसी कर्मचारी व प्रकल्प टिआय, प्रकल्प एलडब्लूएस व प्रकल्प विहान अशासकिय संस्था आयएसआरएसडी व सेतू चॅरीटेबल ट्रस्ट जालना येथील सर्व कर्मचारी आदी सर्वांची उपस्थिती होती.

रॅलीला उद्घाटनापूर्वी डॉ. राजेंद्र पाटील जिल्हा शल्य चिकित्सक यांनी उपस्थितांना शपथ देण्यात येऊन मार्गदर्शकीय माहितीमध्ये “Let Communities Leads” (समाजाचा पुढाकार व एचआयव्ही / एड्सचा समुळ नाश) म्हणजे समाजाच्या सहकार्याने व विविध उपक्रमाद्वारे एचआयव्ही कमी करणे हा होय. युवावर्गांनी एचआयव्ही/एड्स बाबत जास्तीत जास्त संवेदनशील राहुन कसे सुरक्षित राहाता येईल तसेच जास्तीत जास्त गर्भवती महिलांची, अतिजोखीम गटाची, स्थलांतरीत कामगारांची एचआयव्ही तपासणी करुन त्यांचे एचआयव्हीचे स्टेटस जाणून घेण्याबाबत आवाहन केले. व एआरटी औषधोपचारापासून दुरावलेले तसेच उपचारात खंड पडलेल्या लोंकाना या कार्यक्रमाशी जोडण्यात येईल

Previous articleखेळातून सांघिक भावनेचा विकास होतो – जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ
Next articleजिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत अनुप कोहळे द्वितीय
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here