Home जालना खेळातून सांघिक भावनेचा विकास होतो – जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ

खेळातून सांघिक भावनेचा विकास होतो – जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ

39
0

आशाताई बच्छाव

IMG_20231202_180550.jpg

खेळातून सांघिक भावनेचा विकास होतो – जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ
राज्यस्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धेचे उद्घाटन संपन्न
जालना/ दिलीप बोंडे- क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद , जालना यांच्या वतीने जालना शहरात जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर  आयोजित 17 वर्षा खालील  मुले व मुलींच्या राज्यस्तर  शालेय बेसबॉल स्पर्धेचे उद्घाटन जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी खेळाडूंना सांगितले की, तुम्ही जरी वेगवेगळ्या विभागातून आले असाल, परंतु या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण राज्याचा एकच संघ राष्ट्रीय पातळीवर सहभागी होणार आहे, तुम्ही सर्वच आपल्या राज्याचे नावलौकिक करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न कराल आणि म्हणूनच खेळातून सांघिक भावनेचा विकास होत असतो, सदर स्पर्धेतूनच राष्ट्रीय स्पर्धे करीत संघ निवडला जाणार असल्यामुळे तुम्ही तुमच्या संघाच्या कामगिरी वरच लक्ष न देता आपल्या वैयक्तिक कामगिरीवर सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले प्रस्ताविकामध्ये स्पर्धेचे महत्व विषद करून आयोजन समितीच्या वतिने मा . जिल्हाधिकारी डॉ . श्रीकृष्ण पांचाळ सर यांच्या मार्गदर्शनात व संकल्पनेतून प्रथमच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या  सर्व खेळाडूंना  जिल्हा नियोजन समिती व जिल्हा क्रीडा परिषदेच्या माध्यमातून टी शर्ट , कॅप , देण्यात आलेली असून स्पर्धेत प्रथम ,  व्दितीय ,  तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या संघातील खेळाडूंना स्मॉर्ट वॉच , मेडल , ट्रॉफी व राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झालेल्या खेळाडूंना पण स्मार्ट वॉच देण्यात येणार आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here