Home मुंबई जितेंद्र शिंदे आहेत तरी कोण? तडकाफडकी बदलीमागे नेमकं कारण काय…? 🛑

जितेंद्र शिंदे आहेत तरी कोण? तडकाफडकी बदलीमागे नेमकं कारण काय…? 🛑

242
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 जितेंद्र शिंदे आहेत तरी कोण? तडकाफडकी बदलीमागे नेमकं कारण काय…? 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड चर्चेत आले आहेत, अमिताभ यांच्या बॉडीगार्डच्या पगारवरून तर समाजमाध्यमात उलट सुलट चर्चा सुरु आहेत. अमिताभ यांच्या बॉडीगार्डचा पगार तब्बल १२ लाख रुपये आहे, हे ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पगारावरून ते चर्चेत तर आलेच मात्र एक नव्या वादात ते अडकले आहेत..नेमका काय आहे वाद चला जाणून घेऊयात.

कोण आहेत जिंतेद्र शिंदे?
अमिताभ बच्चन हे आज खुलेआम फिरू शकतात ते त्यांच्या बॉडीगार्डमुळे, चाहत्यांच्या गराड्यातून त्यांना सहीसलामत नेण्याचे अवघड काम त्याचे बॉडीगार्ड करत असतात. जिंतेद्र शिंदे हे बच्चनजींसोबत सावलीप्रमाणे असतात.

जिंतेद्र शिंदे हे एक पोलीस कॉन्स्टेबल आहेत जे २०१५ पासून बच्चनजींना सुरक्षा देत आहेत. देशातील बड्या मंडळींना अगदी नेत्यांपासून ते अभिनेत्यांपर्यंत, सगळ्यांना सरकारकडून त्या त्या व्यक्तीच्या दर्जेनुसार त्यांना सुरक्षा दिली जाते. बच्चनजींना एक्स दर्जाची सुरक्षा दिली जात असल्याने त्यांच्या सोबत कायमच दोन कॉन्स्टेबल दिले जातात.

*नेमका वाद काय? *
सरकारी खात्यात काही अधिकाऱ्यांची दर पाच वर्षांनी बदली होती त्याच पद्धतीने पोलिसी खात्यात सुद्धा बदल्या होत असतात. जितेंद्र शिंदे हे पाच वर्षाहून अधिक वेळ बच्चनजींसोबत असल्याने त्याची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. अशी माहिती हेमंत नगराळे यांनी दिली आहे.
वाद इथपर्यंतच नाही तर शिंदे यांच्या पत्नीच्या नावाने एक सिक्युरिटी एजन्सी चालवतात. जी एजेन्सी सेलिब्रेटी लोकांना सुरक्षारक्षक पुरवण्याचे काम करते. शिंदे यांची बदली तर केली आहेच त्याचबरोबरीने आता त्यांच्या अतिरिक्त कमाईवरून त्यांना चौकशीला देखील सामोरे जावे लागणार आहे.

बदलीवरून दबाव?
बच्चनजींचे सर्वात विश्वासू बॉडीगार्ड म्हणून ओळख असलेल्या शिंदेंची बदली होऊ नये म्हणून पोलीस खात्यावर दबाव टाकला जात आहे, अशीदेखील चर्चा होत आहे.

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवडी तर्फे बेरोजगार सेवा संस्थांची स्थापना 🛑
Next articleपोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनात टेम्भुर्णी पोलिसांनी 3 चोरांना 4 तासात केले गजाआड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here