Home विदर्भ विसापुर येथे मुलाने केला बापाचा निर्घुण खून…

विसापुर येथे मुलाने केला बापाचा निर्घुण खून…

651
0

राजेंद्र पाटील राऊत

विसापुर येथे मुलाने केला बापाचा निर्घुण खून…
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर, असलेल्या विसापूर टोली या गावात एका मुलाने आपल्या वडिलांचा खून केल्याची घटना उघडकीस आली.मृतक वडीलाचे नाव दामोदर तागडे वय 55 वर्षे असून, खून करणाऱ्या आरोपीचे नाव तेजस दामोदर काकडे 24 वर्ष राहणार विसापूर आहे
. तेजस हा आपल्या वडिलांचा खून केल्यानंतर फरार झाला होता, परंतु पोलिसांना त्याच्या मोबाईल लोकेशन माहिती कळताच नियोजनबद्ध तपास लावून आरोपीं तेजसला दोन तासात गडचिरोली शहरातील एसटी डेपो च्या परिसरातून पकडण्यात आलेले आहे. खून झाल्याची माहिती पोलिस ठाण्यात मिळताच, ताबडतोब पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी पंचनामा करून मृतक दामोदर तागडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आलेला आहेत. मृतक दामोदर यांना दोन मुले असून मोठा मुलगा सुरजागड येथील पोलिसांच्या सी सिक्सटी या पथकात कार्यरत असून लहान मुलगा आरोपी तेजस हा बेरोजगार होता. दारू नशेत वडिलांसोबत झालेल्या वादामुळे लहान मुलाने कुऱ्हाडी ने हत्या केल्याची माहिती पोलिस तपासामध्ये निष्पन्न झालेली आहे.
पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गावंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन चव्हाण यांच्या नियोजनबद्ध तपासा मुळे आरोपीस अवघ्या दोन तासात ताब्यात घेण्यात आहे. हे विशेष..
पुढील तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.

Previous articleगावातील युवकांनी ग्रामविकास करिता सुध्दा असाच पुढाकार घ्यावा ! आमदार डॉ देवराव होळी
Next articleशेळगांव गौरी च्या रितेश वाघमारे ची मेडीकल एमबीबीएस साठी पात्र.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here