Home नाशिक शिवरायांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कार्यवाही करा – छावा सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले...

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कार्यवाही करा – छावा सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

286

आशाताई बच्छाव

IMG-20230626-WA0049.jpg

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कार्यवाही करा –

छावा सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सामजिक माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करण्यात आली असून त्या व्यक्तीवर त्वरित कडक कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी छावा मराठा सेनेचे जिल्हाध्यक्ष पोपट पताडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम काही अपप्रवृत्ती करत आहेत, महापुरुषांची बदनामी होईल अशा पोष्ट सामाजिक माध्यमातून प्रसारित करून समाजात जातीभेद निर्माण केला जात आहे अशा व्यक्तींवर त्वरित कडक कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा छावा मराठा सेना नाशिक जिल्ह्यात तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा जिल्हाध्यक्ष पोपट पताडे यांनी उपजिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. याप्रसंगी तालुकाध्यक्ष शुभम मेढे, संपर्क प्रमुख जीवन पिंगळे, शहर अध्यक्षा खुशीताई जैन, तालुका संपर्क प्रमुख नितिन राव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

कुठल्याही महापुरुषांची बदनामी छावा मराठा सेना खपवून घेणार नाही, महापुरुष हे आमचे दैवत आहे, त्यांच्या विचारांचा वारसा आजही आम्हाला प्रेरणा देतो, त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरून पोष्ट व्हायरल केली जात असून अशा अप प्रवृत्तीवर त्वरित कार्यवाही करावी.
सुनील भोर–संस्थापक अध्यक्ष छावा मराठा सेना

Previous articleयेणारा प्रत्येक दिवस सर्वसामान्य माणसाचा ! त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करत राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Next articleसंजय जोशी यांच्या उप शहर प्रमुखपदाचा राजीनामा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.