Home पुणे खेड | बाजार समितीच्या सभापतीपदी कैलास लिंभोरे उपसभापतीपदी विठ्ठल वनघरे.

खेड | बाजार समितीच्या सभापतीपदी कैलास लिंभोरे उपसभापतीपदी विठ्ठल वनघरे.

69
0

आशाताई बच्छाव

IMG-20230526-WA0060.jpg

खेड | बाजार समितीच्या सभापतीपदी कैलास लिंभोरे उपसभापतीपदी विठ्ठल वनघरे.
बाजार समितीच्या नथीतून विधानसभेचा तीर!
खेड ,पुणे ,(मयुर चव्हाण प्रतिनिधी )-कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी आमदार दिलीप मोहिते पाटील समर्थक कैलास लिंभोरे, तर उपसभापती पदी विठ्ठल वनघरे यांची निवड झाली.
लिंभोरे-वनघरे यांनी प्रत्येकी 11 संचालकांची मते मिळाली तर विरोधी गटाच्या विजय शिंदे यांनी सभापती पदासाठी तर सुधीर भोमाळे यांनी उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केले होते त्यांना त्यांच्या पॅनल मधील सात संचालकांनी मतदान केले त्यामुळे सभापतीपदी लिंबोरे व उपसभापतीपदी वनघरे यांची निवड झाली आहे.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत आमदार दिलीप मोहिते पाटलांना संधी द्या अशी आग्रह मागणी होत असताना मोहिते पाटलांनी सभापती होण्यास नकार दिल्याने थेट अजित पवारांनी खेळ बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पक्ष निरीक्षक पाठवत, या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले होते.
त्यानंतर सभापती आणि उपसभापती पदासाठी उमेदवाराची निवड सुचवली, त्यानुसार आजची मतदान प्रक्रिया पार पडली, खेळ कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीकडे पूर्ण बहुमत असतानाही भाजपासह सर्वपक्षीयांकडून राष्ट्रवादीला आव्हान देण्यात आल्याने सभापती आणि उपसभापती पदासाठी निवडणूक लावली गेली, त्यामुळे मोहिते पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली होती खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यासह १० आणि अपक्ष ०१ असे संख्याबळ असूनही विरोधातील भाजपकडे सर्वपक्षीय ०६ आणि अपक्ष ०१ असे बलाबल बाजार समितीत होते, सभापती उपसभापतीच्या आज झालेल्या निवडणुकीत बहुमतातील राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पॅनलने अपेक्षेनुसार बाजी मारली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here