Home Breaking News नाभिक समाजाच्या विविध मागण्यांचे वासनिक साहेबांना निवेदन….

नाभिक समाजाच्या विविध मागण्यांचे वासनिक साहेबांना निवेदन….

193
0

बुलडाणा :- स्वप्निल देशमूख ब्यूरो चीफ युवा मराठा न्यूज नेटर्वक

नाभिक समाजाच्या विविध मागण्यांचे वासनिक साहेबांना निवेदन….
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील मा.मुकुलजी वासनिक साहेब यांच्या दौऱ्यानिमित्त संग्रामपूर तालुक्यातील नाभिक बांधवांनी नाभिक समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन त्यांना दिले.
यात प्रामुख्याने शासकीय अध्यादेशाप्रमाणे २०१८ पासून स्थापन न झालेले नाभिक केशशिल्पी बोर्ड स्थापन करणे, कोरोना काळात मयत झालेल्या सलून धारकांना आर्थिक मदत, तसेच इतर राज्यांप्रमाणे नाभिक समाजाचा अ.जा./अ.ज. मध्ये समावेश करणे या मागण्याचे निवेदन देण्यात आले.
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, जळगाव जामोद काँग्रेस पक्षनेत्या स्वातीताई वाकेकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषाताई पवार हजर होते.
निवेदनावर शिवकुमार भातखडे, गोपाल अमृतकर,निलेश आंबुस्कर, विनय चायल,अनंता उंबरकर,संदीप आंबुसकर, अर्जुन बाभुळकर,निलेश भातखडे,चेतन आंबुस्कर,तेजस जावळेकर,सागर भातखडे,आदी समाज बांधव उपस्थित होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here