Home Breaking News शेतकऱ्यांचा ६४ कोटी पिक विमा खेचून आणला ही बाब कौतुकास्पद ! माजी...

शेतकऱ्यांचा ६४ कोटी पिक विमा खेचून आणला ही बाब कौतुकास्पद ! माजी आमदार कृष्णराव इंगळे. महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांकडुन प्रशांत डिक्कर यांचा सत्कार

148
0

बूलडाणा :- स्वप्निल देशमूख ब्यूरो चिफ युवा मराठा न्यूज नेटर्वक
शेतकऱ्यांचा ६४ कोटी पिक विमा खेचून आणला ही बाब कौतुकास्पद ! माजी आमदार कृष्णराव इंगळे.
महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांकडुन प्रशांत डिक्कर यांचा सत्कार
जळगाव : संग्रामपूर जळगाव (जा.) शेगाव तालुक्याला ६४ कोटी ७ लाख २१ हजार रुपये २०२० चा पिक विमा मंजूर करून दिल्याबद्दल बाजार समितीचे सभागृहामधे पार पडलेल्या कार्यक्रमामधे महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार कृष्णराव इंगळे, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक रमेश पाटील,जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष संगितराव भोंगळ, शिवसेना नेते दत्ता पाटील, गजानन वाघ, ॲड संदिप उगले, यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांचा सत्कार करण्यात आला. पुणे मुंबई मधे पिक विमा प्रश्नावर आंदोलन करुण त्या आंदोलनाच्या माध्यमातून कंपनीने ठरवलेल्या ७२ तासांच्या आत तक्रारीच्या निर्णयाला झुगारुन ६४ कोटीचा मंडळनिहाय सरसकट पिक विमा मंजूर करून आणल्याने. प्रशांत डिक्कर यांनी शेतकऱ्यांनसाठी केलेले काम हे कौतुकास्पद ठरले आहे. त्या अनुषंगाने आयोजित केलेला छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम पार पडला. या वेळी ॲड भाऊराव भालेराव, तुकाराम काळपांडे, पुंडलिक पाटील, अजाबराव वाघ, विजय काळे, प्रकाश ढोकणे, संजय धुर्डे, मनोहर वाघ, रुपराव पाटील, अविनाश उमरकर, डॉ प्रशांत दाभाडे, संजय पारवे, प्रमोद तित्रे सय्यदभाऊ बाहोद्दीन, वसंतराव धूर्डे,अंनता मानकर, प्रमोद पाटील, रमेश ताडे संजय भुजबळ, अर्जुन घोलप, श्रीकृष्ण केदार,ईश्वर वाघ,अक्षय भालतडक, हुसेण डायमंड यांच्या सह महाविकास आघाडीतिल बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleसर्पमित्रांचा सत्कार         
Next articleनाभिक समाजाच्या विविध मागण्यांचे वासनिक साहेबांना निवेदन….
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here