Home अकोला पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा १०२ उमेदवारांची प्राथमिक निवड

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा १०२ उमेदवारांची प्राथमिक निवड

180

आशाताई बच्छाव

IMG-20230526-WA0070.jpg

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

१०२ उमेदवारांची प्राथमिक निवड

अकोला : (सतिश लाहुळकर ब्यूरो चीफ अकोला) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास २१९ उमेदवारांनी हजेरी लावली व मुलाखत दिली. त्यातील १०२ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी दिली आहे.

जिल्हाप्रशासनाच्या वतीने दर महिन्याला पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. आज आयोजित मेळाव्यात २१९ उमेदवारांनी हजेरी लावली. त्यातील १०२ उमेदवारांनी प्राथमिक निवड करण्यात आली. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.

रोजगार मेळावा दर महिन्याला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित केला जातो. पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो सह स्वखर्चाने उपस्थित रहावे लागते. दरमहा होणाऱ्या रोजगार मेळाव्यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0724-2433849 अथवा भ्रमणध्वनी क्रमांक 9665775778 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleखेड | बाजार समितीच्या सभापतीपदी कैलास लिंभोरे उपसभापतीपदी विठ्ठल वनघरे.
Next articleआपत्ती प्रतिसाद दलाचे काटेपूर्णा येथे प्रशिक्षण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.