Home नांदेड पाण्याच्या शोधार्थ रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची वानरास धडक ; मृत वानरावर विहीप...

पाण्याच्या शोधार्थ रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची वानरास धडक ; मृत वानरावर विहीप बजरंग कार्यकर्त्यांनी केले अंत्यसंस्कार

223
0

आशाताई बच्छाव

IMG-20230526-WA0064.jpg

पाण्याच्या शोधार्थ रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची वानरास धडक ; मृत वानरावर विहीप बजरंग कार्यकर्त्यांनी केले अंत्यसंस्कार
अंबादास पाटील पवार
लोहा / प्रतिनिधी
मागील कांहीं वर्षात यंदा वातावरणातील तापमान प्रचंड वाढले असून मनुष्य मात्रा सह मुक्या वन्य प्राण्यांनाही उन्हाची दाहकता असह्य झाल्याचे दिसून येत आहे. जंगलातील जलसाठे कोरडे पडल्यामुळे वन्य प्राणी मिळेल त्या ठिकाणी पाणी शोधत फिरताना आढळून येत आहेत. लोहा गंगाखेड हा राज्य रस्ता ओलांडून सुने गाव तलावाच्या दिशेने रस्ता ओलांडणाऱ्या वानरास अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली त्यात सदरील वानर हे जागीच गतप्राण झाले. सदरील घटना दि. २६ रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली. मृत वानरावर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले.
आजघडीला मे महिण्याचा अंतिम कालावधी असून सूर्य देवता आग ओकत आहे. वातावरणातील तापमानामुळे बहुतांश जलसाठे कोरडेठाक पडले असल्याने मानवासह वन्य प्राणी पाण्याच्या शोधार्थ इतरत्र भटकंती करत आहेत. सूनेगाव तलाव पूर्णतः आटल्याने तलावातील डबक्यात साचलेले पाणी पिण्यासाठी वन्य प्राणी तसेच पक्षी तलावाकडे धाव घेत आहेत. दि. २६ रोजी शुक्रवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास एक वानर सुनेगाव लगत लोहा गंगाखेड रस्ता ओलांडत होते. त्याच दरम्यान भरधाव वेगातील एका अज्ञात वाहनाने वानरास जबर धडक दिली त्यात वानर जागीच ठार झाले सदरील माहिती उपस्थित बालाजी पगडे, देविदास वाघमारे या शेतकऱ्यानी विहीप च्या पदाधिकाऱ्यांना दिली असता विश्व हिंदू परिषदेचे तालुकाध्यक्ष अंबादास पाटिल पवार, बजरंग दलाचे तालुका संयोजक गणेश पाटिल कल्याणकर,
यीन चे जिल्हा उपाध्यक्ष
दिनेश पाटील पवार, राजेश पाटिल कुटे, अफरोज शेख, स्वप्निल जाधव, महेश जाधव आदींनी हिंदू रीतिरिवाज व परंपरेनुसार मृत वानरावर अंत्यसंस्कार केले. यावेळी वनविभागाचे वनपाल परमेश्वर घुगे यांनी घटनेचा पंचनामा केला.

Previous articleओबीसी आरक्षण मागणारी ‘मराठा वनवास यात्रा’ पिंपरी चिंचवड शहरात दाखल.
Next articleखेड | बाजार समितीच्या सभापतीपदी कैलास लिंभोरे उपसभापतीपदी विठ्ठल वनघरे.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here