Home विदर्भ पोटेश्वर घाटावरील अवैध उत्खंनन करण्यार्या कंञाटदारावर व संबधित अधिकारावर गुंन्हा दाखल करा।...

पोटेश्वर घाटावरील अवैध उत्खंनन करण्यार्या कंञाटदारावर व संबधित अधिकारावर गुंन्हा दाखल करा। आमदार डॉ.होळी

139
0

राजेंद्र पाटील राऊत

पोटेश्वर घाटावरील अवैध उत्खंनन करण्यार्या कंञाटदारावर व संबधित अधिकारावर गुंन्हा दाखल करा। आमदार डॉ.होळी गडचिरोली:(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- वैनगंगा नदिवरील पोरला येथिल पोटेश्वर घाटावरील रेतीचे अवैध उत्खंनन मोठ्या प्रमाणावर सुरु असुन रेती घाटाचे कंञाटी असण्यार्या कंञाटदाराकडुनच मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खंनन सुरु असल्याचे डॉ.आमदार होळी यांनी भेटी दरम्यान निदर्शनास आल्याने या रेती घाटावरील रेती चोरीची तस्करिची सखोल चौकशी करुन कंञाटदारावर व त्यास मदत करणार्या महसुल विभागाच्या कर्मचारी व अधिकांर्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. आमदार डॉ होळी यांनी आज पोरला येथिल पोटेश्वर घाटावरील होणार्या रेती चोरीची बातमी मिळताच त्यांनी या घाटावरील रेतीची पाहणी केली. यावेळी पंचायत समितीचे सभापती मारोतराव ईचोडकर, उपसभापती विलासरावजी दशमुख , तालुका महामंञी हेमंत बोरकुटे,पोरला ग्रामपंचायतीचे सदस्य मुखरु लाळवे उपस्थित होते. यावेळी आमदार डॉ.होळी मनाले, कि या रेती तस्करीला केवळ कंञाटदारच जवाबदार नसुन यामध्ये स्थानिक तलाठी,मंडळ अधिकारी ,जिल्हा खंनिक्रम अधिकारी, यांच्यासह महसुल विभागाचे अधिकारी जवाबदार आहेत .यामध्ये मोठी आथिर्क देवान घेवान सुरु असल्याने त्या विरुध्दात जाणीवपूर्वक कारवाही केली जात नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.त्यामुळे या संपुर्ण प्रकरणाची स्वंतञ समिती माफत चौकशी करुन दोषिंनवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार डॉ होळी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here