• Home
  • 🛑 मनसेच्या अविनाश जाधवांना जामीन 🛑

🛑 मनसेच्या अविनाश जाधवांना जामीन 🛑

🛑 मनसेच्या अविनाश जाधवांना जामीन 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 8 ऑगस्ट : ⭕ ठाणे मनपा मुख्यालयासमोर कोविड योद्धा नर्सच्या हक्कांसाठी आंदोलन करणारे मनसे नेता अविनाश जाधव यांना ठाणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. जाधव यांना मनपा मुख्यालयासमोर आंदोलन करत असताना पोलिसांनी अटक केली होती.

ऐन कोरोना संकटात नर्सना वेळेवर पगार दिला जात नाही. काही नर्सना नोकरीवरुन कमी केले जाते. या विरोधात मनसे नेता अविनाश जाधव यांनी ठाणे मनपा मुख्यालयासमोर आंदोलन केले होते. हे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी जाधव यांना अटक केली. या प्रकरणी जाधव यांच्यावतीने जामिनासाठी अर्ज करण्यात आला. ठाणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या निर्णयाचे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी स्वागत केले. जनतेसाठी मनसेची लढाई सुरू राहील, असे ते म्हणाले.⭕

anews Banner

Leave A Comment