• Home
  • 🛑 नॅच्युरल आइस्क्रीम ‘या’ कंपनीला फेकावं लागलं तब्बल २६ टन आइस्क्रिम 🛑

🛑 नॅच्युरल आइस्क्रीम ‘या’ कंपनीला फेकावं लागलं तब्बल २६ टन आइस्क्रिम 🛑

🛑 नॅच्युरल आइस्क्रीम ‘या’ कंपनीला फेकावं लागलं तब्बल २६ टन आइस्क्रिम 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 8 ऑगस्ट : ⭕ लॉकडाऊन दरम्यान मुंबईतील एका कंपनीला तब्बल २६ टन आइस्क्रीम फेकावं लागलं आहे. कंपनीने बीएमसी आणि पोलिसांकडे मोफत आइस्क्रीम वाटण्याची परवानगी मागितली होती. मात्र, कोरोनामुळे त्यांना परवानगी मिळाली नाही. यानंतर कंपनीने आइस्क्रीम संदर्भात आणखी चर्चा केली. जाणून घ्या या आइस्क्रीम कंपनीची संपूर्ण गोष्ट

कंपनीचं म्हणणं आहे की, आइस्क्रीम उत्पादन करणारी ही सर्वात मोठी कंपनी आहे. मुंबईच्या नॅचुरल्स आइस्क्रीम फॅक्टरीत ४५,००० छोट्या बॉक्समध्ये पॅक असलेले २६ टन आइस्क्रीम दुकानांमध्ये जाण्यासाठी तयार होती. मात्र महाराष्ट्र सरकारेन १९ मार्च रोजी, उद्यापासून म्हणजे २० जून पासून राज्यभरात लॉकडाऊन घोषित केलं. कंपनीकरता हा सर्वात मोठा फकटा होता. कोरोना व्हायरसमुळे पहिल्यापेक्षा आइस्क्रीमच्या मागणीत खूप मोठी घट आली आहे.

नॅच्युरल आइस्क्रीमचे वाइस प्रेसिडेंट हेमंत नाईक यांनी सांगितल्याप्रमाणे, आइस्क्रीमची एक्सपायरी संपल्यावर त्याचं काय करता येईल याचा आम्ही काही विचार केला नव्हता. डेअरी उत्पादन असल्यामुळे आम्ही याचं काही करू शकत नाही. याला फेकावंच लागलं. कोणतीच कल्पना नसताना महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन घोषित केलं.

नॅच्युरल्स आइस्क्रीम फ्रेशू फ्रूट ज्यूसने तयार केली जाती. यामुळे ते फक्त १५ दिवसांपर्यंतच वापरू शकतात. महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात लॉकडाऊन घोषित केलं. यामुळे कंपनीने प्रयत्न केला की, आइस्क्रीमची एक्सपायर डेट संपायच्या अगोदर ते गरीबांमध्ये वाटावं. पण बीएमसी आणि पोलिसांकडून त्यांना तशी परवानगी नाही.⭕

anews Banner

Leave A Comment