Home Breaking News पुणे एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आजच बँक खाते तपासून पहा

पुणे एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आजच बँक खाते तपासून पहा

90
0

पुणे ८ आँगस्ट ⭕⭕(युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी)⭕⭕
पुणे एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आजच बँक खाते तपासून पहा
राज्य परिवहन महामंडळाकडून आजच परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
गेल्या सहा महिन्यापासून लॉकडावून सुरू असल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला.
तिजोरी खडखडाट झाल्यामुळे राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचा पगार. देण्याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला होता.
परंतु अखेर राज्य सरकारने निधी मंजूर केल्यानंतर आज कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार.
राज्य परिवहन महामंडळाकडून आज परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले.
या पत्रकानुसार एसटी कर्मचाऱ्यांना आज पगार बँक खात्यात जमा होणार आहे.
मार्च आणि एप्रिल महिन्यातील थकीत पगार सुद्धा कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मार्च महिन्यातील पगार ५० टक्के एप्रिल महिन्यातील पगार ७५ टक्के तर मे महिन्यातील १०० टक्के पगार एसटी कामगारांना मिळणार आहे.
त्याच बरोबर जून आणि जुलै महिन्यातील पगारही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश
देण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी कोरोना महामारी कपात
केलेला पगारही मिळणार आहे.
मंगळवारी राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासाठी ५५० कोटी मंजूर केले होते. राज्य सरकारने निधी मंजूर केल्यानंतर

आज कर्मचाऱ्यांना पगारी चे वाटप करण्यात येणार आहे.

Previous article🛑 मनसेच्या अविनाश जाधवांना जामीन 🛑
Next articleबनावट ई पास देताना सख्खे भाऊ सायबरच्या जाळ्यात, सायबर पोलिसांनी केला पर्दाफाश –
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here