Home Breaking News बनावट ई पास देताना सख्खे भाऊ सायबरच्या जाळ्यात, सायबर पोलिसांनी केला पर्दाफाश...

बनावट ई पास देताना सख्खे भाऊ सायबरच्या जाळ्यात, सायबर पोलिसांनी केला पर्दाफाश –

151
0

बनावट ई पास देताना सख्खे भाऊ सायबरच्या जाळ्यात,
सायबर पोलिसांनी केला पर्दाफाश –

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

सोलापूर – कोरोना सृदश्य नसल्याचा बनावट प्रमाणपत्र देत जिल्हा आणि राज्याबाहेरचा जाण्याचा ई पास देणार्‍या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला असून याप्रकरणी दोघा भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शुभम विजयकुमार एकबोटे (वय-२४),राहुल विजयकुमार एकबोटे (वय २८, दोघे रा. गुरूनानक चौक, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.शुभम आणि राहुल हे गुरूनानक येथे शुभम ई-सेवा ऑनलाईन शॉप चालवत होते.या शॉपमधून बनावट ई-पास तयार करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पो.नि.अरूण फुगे यांना बातमीदरामार्फत मिळाली.त्यांनी या ठिकाणी जाऊन खातरजमा केली असता शुभम आणि राहूल हे डॉ.कलबुग्रे यांनी प्रवाशांना दिलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रावर खाडाखोड करत त्याची प्रिंट काढत इतर प्रवाशांना ये-जा करण्यासाठी बनावट जादा पैसे घेऊन वैद्यकीय प्रमाणपत्र देत असल्याचे आढळून आले. दोघांवर सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कामगिरी पो.उ.नि.व्ही.बी. बायस, पो.ना.संतोष येळे, सचिन गायकवाड, मंगरूळे, पो.कॉ.अर्जुन गायकवाड, वासिम शेख, इब्राहिम शेख, प्रवीण शेळकंदे,दीपक जाधव, अमोल कानडे,पूजा कोळेकर आदींनी केली.

Previous articleपुणे एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आजच बँक खाते तपासून पहा
Next article*कर्नाटक सरकारचे भ्याड कृत्य*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here