*कर्नाटक सरकारचे भ्याड कृत्य*
कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)
कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुका मणगुत्ती गावात 2 दिवसांपूर्वी अश्वारूढ श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली होती, पण तेथील काही स्थानिक लोकांनी आणि तथाकथित प्रादेशिक अस्मिता मिरवणाऱ्या संघटनांनी या प्रतिष्ठापणेला तीव्र विरोध करत आणि कर्नाटक प्रशासनाने त्यांचीच बाजू घेत गतरात्री ही मूर्ती चौथऱ्यावरून हटवली.
कर्नाटकात भाजपची सत्ता आहे म्हणून अश्या गोष्टींना महत्व मुद्दामहून दिले जात नाही, हीच गोष्ट बिगर भाजप राज्यात झाली असती तर या बाबत मोठ्याले लेख, पोस्ट, अर्णव सारखे भुंकून त्याच्या सीबीआय तपासाची मागणी करत अक्षरशः हलकल्लोळ झाला असता.
या कर्नाटक सरकारच्या भ्याड कृत्याबद्दल ऊद्या शिवभक्ताचां आंदोलनाचा इशारा दिला आहे.
